Nashik | मंदिरात साट्याबाबा अज्ञातांकडून धार्मिक विटंबना

किल्ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Crime
Crime(File Photo)
Published on
Updated on

मालेगाव : चंदनपुरी शिवारातील ग्रामदैवत साट्याबाबा मंदिरात अज्ञात व्यक्तीने मूर्तीवर मुस्लीम धर्मीयांची टोपी व हिरवी चादर टाकून धार्मिक विटंबना केल्याची घटना सोमवारी (दि.२०) सायंकाळी घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात किल्ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत गणेश मोठाभाऊ बोराडे (२४, रा. बिठ्ठल मंदिरासमोर, चंदनपुरी शिवार, ता. मालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदनपुरी शिवारातील नायरा पेट्रोलपंपासमोरील साट्याबाबा हे गावाचे ग्रामदैवत असून, मंदिरात शेंदूर लावलेली साट्याबाबा यांची मूर्ती तसेच शेजारी आई माउली देवीच्या मूर्ती आहेत. फिर्यादी बोराडे हे दररोजप्रमाणे सोमवारी सायंकाळी सुमारे ७ च्या सुमारास दर्शनासाठी मंदिरात गेले होते.

Crime
Nashik | मनपा प्रभाग समित्यांच्या निवडणुकांना मुहूर्त

त्यावेळी साठ्याबाबा यांच्या मूर्तीवर पांढऱ्या रंगाची मुस्लीम धर्मीयांची गोल टोपी घातलेली तसेच आई माउली देवीच्या मूर्तीबर हिरव्या रंगाची चादर टाकलेली दिसून आली. हा प्रकार पाहून त्यांनी तत्काळ मित्र राज शेलार, शुभम दुबे, महेश दुबे, शुभम सूर्यवंशी तसेच चंदनपुरी गावचे सरपंच विनोद शेलार यांना फोनद्वारे माहिती देऊन मंदिरात बोलावून घेतले.

यानंतर संबंधितांनी मंदिरातील परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी पाहणी करून तक्रार देण्यास सांगितल्याने गणेश बोराडे यांनी मित्र व सरपंचांसह किल्ला पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.

अज्ञात व्यक्तीने ग्रामदैवत साठ्याबाबा व आई माउली देवी यांच्या मूर्तीवर टोपी व चादर चढवून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप फिर्यादीने केला असून, या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेचा पुढील तपास किल्ला पोलिस करत आहेत.

Crime
Nashik News |राज्यातील शाळांत विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे

बुधवारी बंदची हाक

या घटनेविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, या घटनेचा निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले. तसेच चंदनपुरी येथे सायंकाळी बैठक घेऊन बुधवारी (दि.२२) चंदनपुरीसह पंचक्रोशीत बंदची हाक दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news