Nashik News |राज्यातील शाळांत विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे

अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
Nashik News
नाशिक : नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे. समवेत उपमहापौर विलास शिंदे आदी
Published on
Updated on

नाशिक : महिला, मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना स्व-संरक्षण प्रशिक्षण देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये केली. विद्यार्थ्यांना प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी शाळांच्या परिसरातील टपऱ्यांसह अन्य अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देताना पोलिस यंत्रणेने देखील शाळा परिसरात गस्त वाढविण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.

नाशिक महापालिकेच्या शिक्षण

विभागाची आढावा बैठक मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २१) पार पडली. गावेळी महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेता पोलिस प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या. पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते, गटारी या पायाभूत सुविधा तसेच रोजगार आणि मंदिराप्रमाणेच आदर्श पिढी घडविण्यासाठी ज्ञानमंदिरही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नमूद करताना मंदिर उभारणीसाठी जसा संपूर्ण समाज एकत्र येतो तसेच ज्ञानमंदिराच्या उभारणीसाठीही लोक एकत्र आले तर शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा मंत्री भुसे यांनी व्यक्त केली.

शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी महापालिकेच्या शाळाविषयी माहिती सादर केली. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आदी उपस्थित होते.

शाळांचा आराखडा तयार करा

महापालिकेच्या शाळांच्या सक्षमीकरणासाठी, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येका शाळेचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले, शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, वाचनालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, ई-सुविधा आहेत का वाची तपासणी केली जाणार असून, मंत्रालयात प्रस्ताव सादर झाल्याच्या एक तासात मान्यता दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले

Nashik News
Nashik Unseasonal Rain |मार्च महिन्यात अवकाळीने ६५ हजार शेतकरी बाधित

राज्यात लवकरच शिक्षक भरती

येणाऱ्या काळात कला-क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले जाईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना जसे बेट नियुक्त्या दिल्या जातात, त्या धर्वावर विद्यार्थ्यांना गुणांकन पद्धतही भविष्यात लागू केली जाईल, असे नमूद करता ४८६० केंद्रांमध्ये एक क्रीडा शिक्षण राज्यभरातील शाळांमध्ये दिले जातील. दोन महिन्यांनंतर शिक्षक भरती केली जाईल, पवित्र पोर्टलद्वारे ही शिक्षक भरती होईल, असे भुसे म्हणाले.

पटसंख्या ४० हजारांपर्यंत वाढवा

माहापालिकेच्या शाळांमधील घटत्या पटसंख्येबद्दल भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. मनपा शाळांमधील पटसंख्या नवीन शैक्षणिक वर्षांत २९ हजारावरून ४० हजारांपर्यंत वाढवावी, असे शिक्षण विभागाला निर्देश देताना मनपाच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते हा विश्वास लोकांना पटवून देण्यासा‌ठी लोकप्रतिनिधींनी आपल्या पाल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले.

Nashik News
Onion Price Drop 2026 | आखातातील संघर्षामुळे कांदा १० रुपये किलो

एकही शाळा बंद पडता कामा नये!

महापालिकेच्या काही शाळा बंद पडल्या असून, त्या शाळांच्या इमारती अशैक्षणिक कामांसाठी व्ापरल्या जात असल्याबाबत शिक्षणमंत्री भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या शाळा विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक बंद तर पाडल्या नाहीत ना, असा संशय व्यक्त करत यापुढे एकही शाळा बंद पडता कामा नये, असा सज्जड दमच मंत्री चुसे यांनी महापालिकेला दिला.

मंत्री भुसे यांच्या बैठकीतील ठळक मुद्दे

  • सीवीएससीच्या धर्तीवर मनपा शाळांमध्ये अभ्यासक्रम

  • शाळा सक्षमीकरणासाठी शासन तसेच सीएसआरअंतर्गत निधी देणार

  • शाळांमध्ये चार महिन्यांत एकदा भरणार भाजीबााजार

  • शेतीच्या बांधावर निघणार विद्याथ्याँच्या सहली

  • प्रत्येक शाळेत आनंददायी शनिवार उपक्रम

  • अवैध शाळांची तपासणी करून कारवाईचे निर्देश

  • अवाजवी फी वाढ करणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news