Nashik | मनपा प्रभाग समित्यांच्या निवडणुकांना मुहूर्त

मनपा प्रभाग समित्यांच्या निवडणुकांना मुहूर्त
Nashik Municipal Election
Nashik MunicipalPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती निवडणुकीनंतर आता प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकांना मुहूर्त लाभणार आहे. या निवडणुकांसाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला असून, लवकरच या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसंख्येच्या प्रमाणात नाशिक महापालिका क्षेत्रात नऊ प्रशासकीय विभाग अस्तित्वात येणे अपेक्षित असले तरी मनुष्यबळाअभावी पूर्वीप्रमाणेच सहा प्रशासकीय विभाग कायम ठेवण्यात आल्याने सहाच प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने प्रभाग समित्यांवर भाजपाच वरचष्मा राहणार हे स्पष्ट आहे.

Nashik Municipal Election
Nashik Unseasonal Rain |मार्च महिन्यात अवकाळीने ६५ हजार शेतकरी बाधित

नाशिक महापालिकेच्या फेब्रुवारीत झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १२२ पैकी भाजपने सर्वाधिक ७२ जागांवर विजय मिळवत महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेचा इतिहास रचला आहे. २६ सदस्य संख्या असलेली शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे, भाजपने शिवसेनेला उपमहापौरपद देऊन सत्तेत सामील करून घेतले आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे आता भाजप आणि शिवसेनेकडेच राहणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेकडील अपर्याप्त मनुष्यबळ व आर्थिक मर्यादा लक्षात घेता पूर्वीप्रमाणेच सहा प्रभाग समित्या व विभागीय कार्यालयांच्या अखत्यारीतील प्रभाग क्षेत्रांची रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रभाग समिती सभापती निवडणूक घेण्यासंदर्भातील प्रस्ताव नगरसचिव विभागामार्फत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सादर करण्यात आला आहे.

Nashik Municipal Election
Nashik News |राज्यातील शाळांत विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे

भाजपला सर्वाधिक सभापतिपदे

पंचवटी विभागात २४ नगरसेवक असून, भाजपचे सर्वाधिक २१ नगरसेवक आहेत. त्यामुळे सभापती भाजपाचाचं होणार हे स्पष्ट आहे. सातपूर विभागात एकूण २० नगरसेवक असून, त्यात १४ नगरसेवक भाजपचे असल्याने येथेही भाजपचा सभापती होईल पश्चिम विभागात १२ नगरसेवकापैकी भाजपचे सात नगरसेवक असल्याने येथेही भाजपचाचं सभापती होईल. तर पूर्व विभागात १९ नगरसेवक असून, त्यात भाजपकडे ९ नगरसेवक तर शिवसेनेकडेही चार नगरसेवक आहे. या ठिकाणी युतीला संधी मिळणार आहे. सिडकोत २४ नगरसेवक असून, भाजपकडे १२ तर शिवसेनेकडे सात नगरसेवक असल्याने युतीकडे प्रभाग समिती असणार आहे. तर नाशिकरोड विभागात २४ नगरसेवकांपैकी उबाठाकडे १० नगरसेवक असले तरी, येथे भाजपकडे ९ आणि शिवसेनेकडे चार असा १३ बहुमताचा आकडा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news