Nashik murder case: पिझ्झा खाल्ला अन् प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यात चाकू खुपसला! सारूळच्या जंगलातील तरूणीच्या हत्येचा उलगडा

नाशिकमधील सारूळ परिसरात शुक्रवारी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.
Nashik murder case
Nashik murder casefile photo
Published on
Updated on

Nashik murder case

नाशिक: नाशिकमधील सारूळ परिसरात शुक्रवारी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसऱ्या मुलाशी बोलते या रागातून प्रियकरानेच आपल्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीची अमानुष हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

मृताच्या गळ्यात अडकलेला होता चाकू

याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सारूळच्या जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. ही हत्या इतकी क्रूर होती की, तरुणीच्या गळ्यात चाकू तसाच अडकलेला होता. विशेष म्हणजे मृतदेहाजवळ पिझ्झाचे पाकीट आढळले आले होते. या विचित्र पुराव्यांमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते.

बुलढाण्याची तरुणी, नाशिकमध्ये अंत

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मृत मुलीची ओळख पटवली असून ती मूळची बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. आरोपी प्रियकर काही वर्षांपूर्वी नाशिकमधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता, त्यामुळे त्याला या परिसराची माहिती होती.

संशयाचे भूत ठरले जीवघेणे

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रेयसी दुसऱ्या एका मुलाशी बोलते आणि आपल्याकडे दुर्लक्ष करते, असा संशय प्रियकराला होता. याच रागातून त्याने तिला सारूळच्या जंगलात नेले. तिथे मित्रांच्या मदतीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह तसाच फेकून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news