Nashik Road Water Supply | नाशिकरोड पाणीपुरवठा विभागाचा मोठा निर्णय; भीमनगर-बेला डिसूझा जलकुंभाचे वेळापत्रक बदलले

Nashik Road Water Supply | भीमनगर-बेला डिसूझा जलकुंभावरून प्रायोगिक तत्त्वावर वेळापत्रकात २८ पासून बदल
Nashik Road Water Supply
Nashik Road Water Supplyfile photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड पाणीपुरवठा विभागातील भीमनगर-बेला डिसूझा जलकुंभावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रभाग १७, १९ व २० मधील विविध भागांत २८ पासून प्रायोगिक तत्त्वावर एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी एकवेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली होती.

Nashik Road Water Supply
Maternity Benefit Scheme | कुपोषणमुक्तीकडे मोठे पाऊल; लाभार्थी संख्येत नाशिक जिल्हा राज्यात 'नंबर वन'

प्रभाग २० मधील शिखरेवाडी, प्रकाशनगर, महात्मा गांधी सोसायटी, अमन सोसायटी, गंधर्वनगरी, लोकमान्यनगर, एलआयसी रोड, पुणे रोड, चंद्रमणीनगर व स्लम परिसर, आरंभ महाविद्यालय, आनंद सोसायटी, झेवियर कॉलनी, गजानन मंदिर, इंगळे कॉलनी, गुजराती हॉस्पिटल, शाहूनगर,

नोटवाणी रोड, उत्सव मंगल कार्यालय, दत्तमंदिर रोड, सदगुरू हॉटेल आणि स्वामी समर्थ मंदिर परिसरात सकाळी ६ ते ८ या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रभाग १७ मधील भीमनगर, ब्रह्मगिरी व कैलासजी सोसायटी परिसरात तसेच प्रभाग २० मधील भीमनगर गॅस एजन्सीसमोरील ख्रिश्चन कॉलनी, जिजामाता नगर स्लम, रामनगर,

Nashik Road Water Supply
Nashik Ring Road | नाशिक रिंगरोडच्या कामाला मोठा वेग; मध्यवर्ती कारागृहाची 3 एकर जागा MSIDC कडे हस्तांतरित!

कलानगर १ व २, नवीन-जुने आशानगर, व्यापारी बँक आणि गोरेवाडी परिसरात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रभाग १९ मधील गोरेवाडी परिसरात रात्री ८ ते १२ या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.

हा बदल सोमवार (दि. २८) पासून लागू होणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घेत मनपास सहकार्य करावे, असे आवाहन नाशिकरोड विभागाचे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news