Nashik Road Water Pipeline | जेल रोडला जलवाहिनी फुटली; चार दिवसांपासून पाणी वाया

Nashik Road Water Pipeline | दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
पाण्याची टाकी फूटली संग्रहित फोटो
पाण्याची टाकी फूटली संग्रहित फोटो
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेल रोड परिसरातील शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी चौकात मनपाच्या खोदकामात जलवाहिनी फुटल्याने चार दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीतही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाण्याची टाकी फूटली संग्रहित फोटो
Nashik cattle transport: चांदवड पोलिसांची धाडसी कारवाई; चार गोवंशांची सुटका

मनपाने काही महिन्यांपूर्वी या परिसरात गॅस पाइपलाइनचे काम केले होते. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे मातीने बुजवण्यात आले होते. सध्या त्या ठिकाणी माती काढून खडी टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून मॉडेल कॉलनीतील गणपती मंदिरासमोरील चौकातील जलवाहिनी फुटली.

त्यानंतर रस्त्यावरून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. स्थानिक नागरिकांनी मनपाच्या विभागीय अधिकाऱ्यांना वारंवार फोनवरून माहिती दिली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

पाण्याची टाकी फूटली संग्रहित फोटो
Nashik TCS Employee Case | मतीन पटेल यांना एसआयटीचे समन्स

विशेष म्हणजे, मनपा आयुक्तांचा जेल रोड परिसराचा दौरा झाला तेव्हाही रस्त्यावरून पाणी वाहात असल्याचे चित्र होते. दरम्यान, गंगापूर धरणातील पाणीसाठा उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने कमी होत असून, प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news