Nashik Road Jail Video | मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांची ओली पार्टी

Nashik Road Jail Video | या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Nashik Road Central Jail
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहPudhari News network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीसोबत मद्यपान करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Nashik Road Central Jail
Air India Flights Cancelled | गोव्याच्या पर्यटनाला विमान कंपन्यांचा मोठा धक्का! जूनच्या वेळापत्रकातून एअर इंडियाच्या अनेक फेऱ्या रद्द

या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाशिकरोड कारागृहाच्या कर्मचारी वसाहत परिसरातच वरिष्ठ अधिकारी आणि जामिनावर बाहेर असलेल्या संशयित आरोपीसोबत कथित ओली पार्टी सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

कारागृह परिसरातच अशा प्रकारे मद्यपानाचा कार्यक्रम झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, व्हिडिओत दिसणाऱ्या सदर अधिकारी वादग्रस्त आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ खुलासा मागवून कारवाई थांबणार की संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर निलंबनाची कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik Road Central Jail
US attack on Iran: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! होर्मुझ समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या नौका आणि क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त

देशातील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील कारागृहांपैकी एक म्हणून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाची ओळख आहे. या कारागृहात तीन हजारांहून अधिक कैदी असून, काही संवेदनशील आणि देशहिताशी संबंधित प्रकरणांतील आरोपीदेखील बंदिस्त आहेत. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच निष्काळजीपणाचे चित्र समोर येणे गंभीर मानले जात आहे. यापूर्वीही हे कारागृह विविध गैरप्रकारांमुळे चर्चेत राहिले आहे. कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारचे कृत्य होत असल्याने कारागृहातील प्रशासनाच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

संबंधित अधिकाऱ्याचे यापूर्वी तीन वेळा निलंबन

व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या सदर अधिकाऱ्यावर यापूर्वी तीन वेळा निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कार्यालयीन शिस्तभंगाबद्दल वेतनवाढ रोखणे, सक्त ताकीद देणे आणि प्रशासकीय शिक्षांसह चार वेळा कारवाई झाल्याचे समजते.

सदर घटनेची दखल घेतली आहे. या संबंधित अधिकाऱ्यांचा कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविलेला आहे.

अरुणा मुगुटराव, कारागृह अधीक्षक, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news