Nashik Ramtirtha-रामतीर्थावर उभारणार ५१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ

पुरोहित संघाच्या मागणीस कुंभमेळा आयुक्तांचा प्रतिसाद
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील पुरोहित संघाने मांडलेली भव्य ध्वजस्तंभ उभारणीची मागणी अखेर मंजूर झाली आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुरोहित संघात समाधानाचे वातावरण आहे. लवकरच या ध्वजस्तंभाचे शिलान्यास पूजन पार पडणार असून, सिंहस्थाच्या आध्यात्मिक वैभवात या उपक्रमामुळे भर पडणार आहे.

रामतीर्थ परिसरात उभारण्यात येणारा हा ध्वजस्तंभ सुमारे ५१ फूट उंच असणार आहे. त्याची रचना धार्मिक प्रतीकांनी समृद्ध आणि आकर्षक स्वरूपाची असेल. या संकल्पनेचा आधार समुद्र मंथन अर्थात अमृत मंथन कथेतून घेतला असून, धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम यातून दर्शविण्यात येणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik milk -दूध भेसळ रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना निर्देश

दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेला जुना ध्वजस्तंभकाढून त्या जागी नवीन ध्वजस्तंभउभारण्यात येणार असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिली. त्यामुळे नवीन स्तंभ अधिक मजबूत, सुरक्षित आणि आकर्षक स्वरूपात उभारला जाईल. रामतीर्थ परिसरातील हा ध्वजस्तंभ भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरेला अधिक बळकटी देईल. लवकरच होणाऱ्या शिलान्यास सोहळ्याकडे भाविक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik water cut - सिडको, नाशिकपूर्व भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

असा असणार ध्वजस्तंभ

ध्वजस्तंभावर अश्व, हत्ती, रत्न, कल्पवृक्ष, अप्सरा तसेच विविध देवी-देवतांची प्रतीकात्मक शिल्पे साकारण्यात येणार आहेत. याशिवाय गणपती आणि कमळ यांसारखी शुभचिन्हेही स्तंभावर कोरली जाणार आहेत. या सर्व घटकांमधून अमृत मंथनातील विविध प्रतीकांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. स्तंभाचा तळभाग कमळाच्या आकारात तयार करण्यात येणार असून, मध्यभागात कोरीव कलाकुसरीचे पट्टे आणि धार्मिक चिन्हांनी सजवलेले भाग असतील. शीर्षस्थानी ध्वजासह देवतांची प्रतिमा स्थापित करण्यात येणार आहे, ज्यामुळे संपूर्ण रचना अधिक भव्य आणि देदीप्यमान भासणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news