Nashik- ठाम रहा, आंदोलनात उतरतो, राहुल गांधी यांनी दिली आदिवासी आंदोलनकर्त्यांना ताकद

Rahul Gandhi tribal protest Nashik-ठाम रहा, आंदोलनात उतरतो राहुल गांधी यांनी दिली आदिवासी आंदोलनकर्त्यांना ताकद
नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी.
नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी.
Published on
Updated on

नाशिक : आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात विद्यार्थी व जेन झीने सुरू केलेले आंदोलन आणि या आंदोलनानंतर एल्गार मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मागण्या शासन दरबारी मांडल्या. यातील प्रमुख मागणी म्हणजे आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक ऊईके यांचा राजीनामा घेतल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याची भूमिका ठाम असताना जेन झी आंदोलकांनी आणि उपोषणकर्त्यांनी बुधवारी (दि.१) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली.

अर्धा तास राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम रहा, आम्ही तुम्हाला बळ देऊ. तुमच्या मागणीप्रमाणे त्र्यांचा राजीनामा घ्यायला आपण भाग पाडू, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी यावेळी मांडली. या भूमिकेमुळे आदिवासी आंदोलकांचा उत्साह अधिक दुणावला आहे.

आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांतील सुविधा आणि पोषण आहाराबाबत काढलेल्या वादग्रस्त शासन निर्णयाविरोधात आदिवासी युवक व विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वादग्रस्त आदेशाला घाईघाईने स्थगिती दिली खरी. मात्र, या जेन झीचा रोष शमलेला नाही. आक्रमक झालेल्या जेन झी ने मंगळवारी (दि.१) नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयावर राज्यव्यापी महामोर्चा काढत एल्गार पुकारला.

नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी.
Rahul Gandhi Simhastha corruption| सिंहस्थ कामांतील भ्रष्टाचारावर संसदेत आवाज उठवणार

यावेळी आदिवासी मंत्री प्रा. अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, प्रधान सचिव सचिन वाघमारे, आयुक्त लीना बनसोड यांना हटवा अशी मागणी केली. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली. असे असतानाच बुधवारी राहुल गांधी यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. एमटीडीसी रिसोर्टमध्ये आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते दुपारी दाखल झाले. यावेळी बंद खोलीत राहुल गांधी यांनी आदिवासी उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते यांच्याशी वन टू वन संवाद साधला.

नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी.
MHADA scam suspensions | म्हाडा घोटाळा प्रकरणी मंडल अधिकाऱ्यासह तीन तलाठी निलंबित

तुम्हाला नेमके काय हवं अशी विचारणा देखील त्यांनी यावेळी केली. आंदोलन कायम ठेवा. मी तुमच्या आंदोलनात उतरतो. तुमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत साथ देऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यासाठी तुमच्या आंदोलनाची दिशा निश्चित करा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राहुल पावरा, सागर पावरा, विवेक गावित, लक्ष्मी जाधव, प्रशांत गावंडे, अरुण पावरा, सचिन पावरा यांसह संभाजीनगर, नंदुरबार, पुणे येथील उपोषणकर्ते उपस्थित होते

आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. त्यांनी शांतपणे आमचे म्हणणे ऐकूण घेत प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर दिले. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना त्यासाठी काय पर्याय अवलंबला पाहिजे, याविषयी त्यांनी चर्चा केली. त्यामुळे आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवत आहोत.

- राहुल पावरा, उपोषणकर्ता

आदित्य ठाकरेंचा आज संवाद

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे गुरुवारी (दि.३) सकाळी १०:४५ वाजता ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या आदिवासी उपोषणकर्ते व विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news