Nashik Politics | तर महायुतीतील हे सात आमदार ‘डेंजर झोन’मध्ये 

Nashik Politics | तर महायुतीतील हे सात आमदार ‘डेंजर झोन’मध्ये 
Published on
Updated on

[author title="नाशिक : मिलिंद सजगुरे" image="http://"][/author]

लोकसभा निवडणुकीत ४५ प्लस जागा जिंकण्याची घोषणा केलेल्या महायुतीचा वारू केवळ 17 जागांवर अडल्याने घटक पक्षांत ब्लेमगेम सुरू झाला आहे. विशेषत:, अजित पवार गटाचे आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्रांत भाजप वा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाल्याचा जाहीर आरोप होत असल्याने महायुतीत 'ऑल इज नॉट वेल' असल्याचे अधोरेखित झाले आहे. परिणामी, उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतील भवितव्याबाबत इच्छुकांच्या चिंतेत भर पडली आहे.

नाशिक, दिंडोरी आणि धुळे या अडीच लोकसभा मतदारसंघांत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. उपरोक्त तीनही लोकसभा मतदारसंघांत महायुती उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर अजूनही त्याबाबत कवित्व सुरू आहे. नाशिक मतदारसंघात इगतपुरी- त्र्यंबकेश्वर वगळता, नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम तसेच देवळाली, सिन्नर या उर्वरित पाच विधानसभा क्षेत्रांत महायुतीचे आमदार आहेत. कागदोपत्री महायुती बलशाली वाटत असली, तरी नाशिक पूर्व आणि पश्चिम वगळता, उर्वरित चार ठिकाणी उमेदवार हेमंत गोडसे यांची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट होऊन महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे वरचढ ठरले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तर सहाही विधानसभा क्षेत्रांत महायुतीचे आमदार असल्याने उमेदवार डॉ. भारती पवार सेफ झोनमध्ये असल्याचा दावा करण्यात येत होता. तथापि, तिथेही चांदवड-देवळा आणि नांदगाव वगळता, महायुती उमेदवार भास्कर भगरे यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाची नोंद केली.

धुळे मतदारसंघातील बागलाण, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य हे मतदारसंघ जिल्ह्यात येतात. इथे अनुक्रमे भाजप, एमआयएम, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. महायुतीच्या डॉ. सुभाष भामरे यांनी बागलाण आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांत आघाडी टिकवली असली, तरी महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्यने निर्णायक विजयी आघाडी दिली. याच अनुषंगाने विधानसभा निवडणुकीत मतदारांची मानसिकता कायम राहिली, तर आज महायुतीचे कागदोपत्री असलेले 13 आमदारांचे बलाबल सहा वर येऊ शकते. त्यादृष्टीने लोकसभा निकालानंतर खडबडून जागे झालेल्या महायुतीकडून डॅमेज कंट्रोलसाठी काय बांधबंदिस्ती करण्यात येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे आमदार 'सेफ झोन'मध्ये..

सीमा हिरे (भाजप, नाशिक पश्चिम), राहुल ढिकले (भाजप, नाशिक पूर्व), डॉ. राहुल आहेर (भाजप, चांदवड- देवळा), सुहास कांदे (नांदगाव), दादाजी भुसे (शिवसेना शिंदे गट, मालेगाव बाह्य), दिलीप बोरसे (भाजप, बागलाण)

हे आमदार 'डेंजर झोन'मध्ये..

देवयानी फरांदे (भाजप, नाशिक मध्य), सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट, देवळाली), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट, सिन्नर), छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट, येवला), नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट, दिंडोरी-पेठ), नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट, कळवण- सुरगाणा), दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट, निफाड)

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news