Nashik Teachers’ Constituency : महायुतीचे आमदार झिरवाळ यांचा ठाकरे गटाचे उमेदवार गुळवे यांना पाठिंबा

Nashik Teachers’ Constituency : महायुतीचे आमदार झिरवाळ यांचा ठाकरे गटाचे उमेदवार गुळवे यांना पाठिंबा

Nashik Teachers' Constituency : राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी शिक्षक मतदार संघाचे उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीरीत्या पाठिंबा देत त्यांची भेटही घेतली आहे.

नाशिक : ऑनलाईन पुढारी डेस्क-  नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संदीप गुळवे यांचे काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. संदीप गुळवे हे शिवसेना ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार आहेत. तर झिरवाळ हे महायुतीचे आमदार आहेत, नरहरी झिरवाळ यांची भूमिका अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे. त्यांनी १ जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामध्ये पक्ष प्रवेश केला होता. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. दोन्ही पक्षाच्या सहमतीतून संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात झाला होता. त्यानंतर त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती.

झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट देखील घेतली होती. त्यांनंतर झिरवाळ यांच्याकडून आता गुळवे यांना पाठींबा देण्यात आल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे संदीप गुळवे यांची कामे देखील करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार असे दोन गट पक्षात निर्माण झाले आहेत. पक्षातील अनेक आमदारांनी सुरुवातीपासून अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये नरहरी झिरवाळ यांचा देखील समावेश होता. मात्र त्यांनी आता वेगळी भूमिका घेत संदीप गुळवे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चर्चाला वेगळे वळण आल्याचे बघावयास मिळत आहे.

संदीप गुळवे कोण आहेत?

अ‍ॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे २०१२ ते २०१७ पर्यंत ते सदस्य होते. महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते सद्य परिस्थितीत संचालक आहेत. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी ते निगडीत आहेत. ते काँग्रेस पक्षात असून ठाकरे गटात त्यांनी नुकताच प्रवेश केलेला असून ते नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news