Nashik Police | नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 402 उपद्रवींवर हद्दपारीचा बडगा

Nashik Police | 27 सप्टेंबरपर्यंत शहरात वास्तव्य करण्यास मनाई
Police
PolicePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावा तसेच शहरातील सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नाशिक शहर पोलिसांनी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Police
Nashik-Pune railway highway |नाशिक-पुणे रेल्वे महामार्ग वादात भुजबळांची उडी

या कारवाईचा भाग म्हणून परिमंंडळ - १ आणि परिमंडळ - २ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४०२ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना दि. २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात शांतता भंग, सार्वजनिक उपद्रव अथवा कायदा - सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी संभाव्य उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंंडळ - १ मध्ये १२७ जणांवर कारवाई करण्यात आली.

Police
Nashik Ganesh Mandal | नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय! सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप शुल्क पूर्णपणे माफ

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव ७, पंचवटी २२, म्हसरूळ १०, भद्रकाली २४, सरकारवाडा ११, गंगापूर २२ आणि मुंबई नाका ३१ जणांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ - २ मध्ये २७५ जणांवर कारवाई झाली. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड ४०, सातपूर ५३, इंदिरानगर ३६, एमआयडीसी २५, नाशिकरोड ४२, उपनगर ४६ आणि देवळाली कॅम्प ३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सव काळात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, कायदा - सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कारवाईची आकडेवारी

  • परिमंडळ - १ : १२७

  • परिमंडळ - २ : २७५

  • एकूण प्रतिबंधात्मक कारवाई : ४०२ व्यक्ती

  • हद्दपारीची मुदत : २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news