Nashik Ganesh Mandal | नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय! सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप शुल्क पूर्णपणे माफ

Nashik Ganesh Mandal | सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत महापौरांची घोषणा
Ganesh Mandal Electricity
Ganesh Mandal Electricity AI IMAGE
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सवात रस्ते खड्डेमुक्त, मिरवणूक मार्ग अतिक्रमण व अडथळामुक्त करण्याचे वचन देतानाच गतवर्षाप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप शुल्क माफी देण्याची घोषणा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केली.

Ganesh Mandal Electricity
NDCC Bank | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकांची पुन्हा फेरचौकशी; सहकार विभागाचे मोठे आदेश

दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी आरास स्पर्धेची प्रशासकीय राजवटीत बंद पडलेली परंपरा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करताना यंदा सहा लाखांहून अधिक रक्कमेची पारितोषिके मंडळांना दिली जातील, असे महापौरांनी स्पष्ट केले.

महापौर आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक गुरुवारी (दि. १०) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील प्रांगणात पार पडली. यावेळी आ. देवयानी फरांदे, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेटे, भाजप गटनेते श्याम बडोदे, सीमा ठाकरे, शाहू खैरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रशासकीय राजवटीत खंडित झालेली महापालिकेतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी उत्कृष्ट आरास स्पर्धेची परंपरा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा महापौरांनी केली. महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या पुढील काळात उत्सवाच्या एक महिना अगोदर घेण्यात येईल, असे नमूद करत मंडळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला. जनसंपर्क विभागाच्या असमन्वयामुळेच बैठकीचे नियोजन झाले नसल्याची तक्रार करत मंडळांसाठी प्रोत्साहनपर उपाययोजना करण्याची सूचना उपमहापौर विलास शिंदे यांनी केली.

महापौरांचे निर्णय

  • गणेशोत्सव काळात रस्ते खोदकाम बंदी

  • विसर्जन मिरवणूक मार्ग खड्डे व अतिक्रमणमुक्त करणार

  • महापौरांसह पदाधिकारी गणेश मंडळांना भेटी देणार

  • विसर्जनस्थळी जीवरक्षकांसह सुरक्षात्मक उपाययोजना करणार

  • गणेश मंडळांसाठी आरास स्पर्धेचे आयोजन

  • सहा लाखांहून अधिक रोख रक्कमेची बक्षिसे देणार

Ganesh Mandal Electricity
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत स्थायी समितीचा मोठा उद्रेक; 650 कोटींची वाढीव कामे कागदावरच!

२४ तासांत तक्रारींचे निवारण

बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. गणेशोत्सव काळात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम फिल्डवर असेल. मंडळांच्या तक्रारींचे २४ तासांत निवारण केले जाईल. सिंहस्थ कामांमुळे गणेश मंडळांना काही अडचणी जाणवत आहेत याची कबुली देताना महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्त खत्री यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news