Dadasaheb Phalke Memorial Nashik | दादासाहेब फाळके स्मारकात साकारणार 'वेस्ट टू वंडरपार्क'

Dadasaheb Phalke Memorial Nashik | रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार
nashik news
nashik news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकात हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या 'वेस्ट टू वंडरपार्क' प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दिल्लीतील 'झेड टेक' या मक्तेदार कंपनीमार्फत पीपीपी तत्त्वावर या प्रकल्पाची उभारणी केली जात असून, पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

nashik news
Pune: शवविच्छेदन अहवाल आल्यावर चिंकाराच्या मृत्यूचे कारण होणार स्पष्ट : माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे

प्रकल्प उभारणीनंतर सदर कंपनीला २० वर्षे मुदतीच्या करारावर प्रकल्प चालविण्यास दिला जाणार असून, या माध्यमातून महापालिकेला कुठलाही खर्च न करता दरमहा १.२३ लाखांची रॉयल्टीदेखील मिळणार आहे. जनक भारतीय चित्रपटसृष्टीचे दादासाहेब फाळके हे मूळचे नाशिककर असल्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९९८ मध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी २९ एकर जागेवर भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.

ओपन थिएटर, उद्यान, कॅफेटेरिया, दादासाहेबांनी हाताळलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आदी वैशिष्ट्ये या स्मारकाची असली तरी कालांतराने या प्रकल्पाची दुरवस्था झाली. गेल्या काही काळात या स्मारकाचा बीओटीवर विकास करण्याचेही प्रयत्न झाले.

परंतु त्यात यश आले नाही. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी मुंबईच्या फिल्मसिटीच्या धर्तीवर या स्मारकाचा विकास करण्याचा निर्धार करत, पीपीपी तत्त्वावर एनडी स्टुडीओचे नितीन देसाई यांच्यासह मुंबईच्या मंत्रा एक्स्पोर्ट प्रा. लिमिटेड यांना स्मारकाच्या विकासाचे काम सोपविण्याची तयारी केली होती.

परंतु त्यात विरोध झाल्यानंतर महापालिकेने स्वतःच प्रकल्पाचा विकास करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी शासनाच्या पर्यटन विभागाकडे ५० कोटींची मागणीही केली गेली; परंतु महापालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळून शकल्याने अखेर पीपीपी तत्त्वावरच या प्रकल्पाचा विकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली.

nashik news
Pune: शवविच्छेदन अहवाल आल्यावर चिंकाराच्या मृत्यूचे कारण होणार स्पष्ट : माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे

असा असणार प्रकल्प

रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर 'वेस्ट टू वंडरपार्क' या थीमखाली छोटेखानी फिल्मसिटी उभारली जाणार असून त्यात शोले, बाहुबली, आमेर किल्ल्याची प्रतिकृती उभारली जाणार आहे.

तीन महिन्यांसाठी स्मारक बंद

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक परिसरात 'वेस्ट टू वंडरपार्क' प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे २१ फेब्रुवारी ते १ एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी फाळके स्मारक बंद राहणार आहे.

फिल्मसिटीच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या 'वेस्ट टू वंडरपार्क' प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिककरांना मनोरजंनाची एक उत्तम संधी प्राप्त होणार आहे. कुठलाही खर्च न करता या प्रकल्पातून महापालिकेला दरमहा उत्पन्नही प्राप्त होणार आहे.

विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news