Nashik News I जिल्ह्यात कांदादराची घसरण थांबता थांबेना

Nashik News I जिल्ह्यात कांदादराची घसरण थांबता थांबेना
Published on
Updated on

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव बाजार समितीत कांदा दर पुन्हा घसरले असून, कांद्याला सरासरी १३१० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली. कांद्याला निच्चांकी दर मिळाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असून केंद्राकडून निर्यात बंदी उठविणे संदर्भात कुठलाही तोडगा निघत नसल्याचे दिसत आहे.

नोव्हेंबर २०२३मध्ये लाल कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आवक मर्यादित होती. तेव्हा प्रतिक्विंटल ३५०० रुपयांपर्यंत सरासरी दर होते. मात्र निर्यातबंदीमुळे क्विंटलमागे २००० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा झाला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला १८०० ते १९०० रुपयांवरून दर १३०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे क्विंटलमागे ६०० रुपयांपर्यंत तोटा सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवसेंदिवस कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी वाढत असल्याची गंभीर स्थिती आहे.

देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ७ डिसेंबर रोजी निर्यातबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फास ठरत आहे. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार आवारांमध्ये कांद्याला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सरासरी १८०० ते २००० रुपयांपर्यंत सरासरी दर होता. सध्या लाल कांदा सरासरी १३०० रुपये दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. कांदा निम्याहून अधिक दराने कोसळल्याने शेतकरी वर्गाच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. घाऊक बाजार ३४ रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखवली होती. पण निर्यातबंदी जाहीर झाली व या भावाला ग्रहण लागले. त्यानंतर भाव गडगडतच गेले. नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील कांदाही बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तरी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कांदा भाव आलेख (सरासरी)प्रति क्विंटल
२ जानेवारी – २१७० रुपये
५ जानेवारी – १८२० रुपये
१३ जानेवारी – १७४० रुपये
१६ जानेवारी – १६७५ रुपये
१८ जानेवारी – १५५१ रुपये
२३ जानेवारी – १३१० रुपये.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news