Nashik News : तहसीलदार अहिरराव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

Nashik News : तहसीलदार अहिरराव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हाधिकारी कार्यालयामधील तहसीलदार (सामान्य प्रशासन) राजश्री अहिरराव यांचा राजीनामा शासनाने मंजूर केला आहे. मंगळवारी (दि.९) अहिरराव या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे देवळाली मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आले आहे.

तहसीलदार अहिरराव यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा शासनाकडे सादर केला होता. त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. देवळाली मतदारसंघामधून त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण शासनास्तरावर राजीनामा मंजूर हात नसल्याने अहिरराव यांनी वेट ॲण्ड वॉचच्या भुमिका स्विकारली होती. अखेर तीन दिवसांपूर्वी शासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे देवळाली मतदारसंघात विविध तर्कवितर्क लढविले जात आहे. मंगळवारी नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अहिररावांचा पक्षप्रवेश सोहळा निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, २०१९ च्या निवडणूकीवेळी देवळालीतून अहिरराव यांची प्रमुख दावेदारी होती. परंतु, शासनस्तरावर राजीनाम्यासह अन्य तांत्रिक अडचणींमुळे त्यांना निवडणूक रिंगणात उतरता आले नव्हते. यंदा विधानसभा निवडणूकांसाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना अहिरराव या शासकीय सेवेतून मुक्त झाल्या आहेत. त्यात गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी देवळाली मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली आहे. त्या मुळे सप्टेंबर-ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये देवळाली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली जाऊ शकतात.

हेही वाचा ;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news