Inter-State Council Secretariat Ministry of Home Affairs, Government of India
'गृह' मंत्रालय बैठकfile photo

Nashik News |'गृह' मंत्रालयाची आज नाशिकमध्ये बैठक

Inter-State Council Secretariat : पश्चिम भारतामधील राज्यांचा समावेश
Published on

नाशिक : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आंतरराज्य परिषद सचिवालयातर्फे शुक्रवारी (दि.२) नाशिकमध्ये २७ व्या पश्चिम विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृह सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ताज येथे सकाळी १० पासून परिषद पार पडणार आहे. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. (Inter-State Council Secretariat Ministry of Home Affairs, Government of India)

केंद्र सरकारच्या सशक्तीकरणाबरोबर राज्यांमध्ये केंद्र व राज्यांतील धोरणात्मक आराखडा, संघ राज्यवादावर भर देण्यासाठी दरवर्षी परिषदेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी परिषदेच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे. परिषदेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव प्रदेशातील सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Inter-State Council Secretariat Ministry of Home Affairs, Government of India
Nashik News | 'गृह' मंत्रालयाच्या बैठकीची जय्यत तयारी

एकदिवसीय पश्चिम विभागीय परिषदेत महिला व बालकांवरील लैंगिक गुन्हे आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद तपास, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यातील खटल्यांचा निपटाऱ्यासाठी जलदगती विशेष न्यायालयांची अंमलबजावणीवर विशेेष चर्चा होणार आहे. गृह मंत्रालयाकडून परिषदेमधून चर्चिल्या जाणाऱ्या मुद्यांचा अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल केंद्रीय निती आयोगापुढे सादर केला जाणार असल्याने परिषदेला विशेष महत्व आहे. त्यामुळे परिषदेच्या आयोजनात काेणत्याही उणिवा भासू नये, या दृष्टीने महसूल विभागाकडून नियोजनावर भर देण्यात येत आहे.

Inter-State Council Secretariat Ministry of Home Affairs, Government of India
Nashik News | 'गृह'च्या पश्चिम विभागीय बैठकीचा मान नाशिकला

सामान्यांच्या विषयांवर चर्चा

परिषदेत सर्वसामान्यांच्या दृष्टीने निरनिराळ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. रस्ते जोडणी, वीज, उद्योग, बँका व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखांची सुविधा, कुपोषण दुर करणे, शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सरकारी रुग्णालयांचा सहभाग आदी विषयांचा त्यात समावेश असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news