Nashik News :’एकावर एक फ्री’च्या नादात बसला गंडा, खोक्यात चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या

Nashik News :’एकावर एक फ्री’च्या नादात बसला गंडा, खोक्यात चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा येथील एकाला ऑनलाइन ६१ हजार रुपयांचा गंडा बसल्याचा प्रकार उघडकीस आला. श्रीपाद गोविंदराव पिंपरकर (४५, रा. चौकीमाथा) हे पाैरोहित्य करतात. त्यांनी बाय वन गेट वन फ्री ही जाहिरात समाजमाध्यमांवर पाहिली होती. त्यासाइटवर जाऊन तेलाची बाटली व चष्मा या दोन वस्तू कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडून मागवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (दि. ६) या वस्तू घेऊन डिलिव्हरी बॉय त्यांच्याकडे आला. त्याच्याकडील मोबाइलमधील व्हॉट्सॲप क्यूआर कोड दोन वेळा स्कॅन करून गुगल पे द्वारे ४९९ व ९९९ रुपये अदा केले आणि त्याच्याकडील बॉक्स ताब्यात घेतले. मात्र ते उघडून पाहिले असता, त्यामध्ये चष्म्याऐवजी केवळ कापडाच्या चिंध्या निघाल्या. याबाबत त्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार केली. कंपनी प्रतिनिधीने त्यांना वैयक्तिक व बँक खाते याबाबत माहिती एका लिंकद्वारे भरण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या एसबीआय बँकेतील खात्यामधून ५० हजार रुपये आणि ११ हजार रुपये असे एकूण 61 हजार रुपये डेबिट झाल्याचा संदेश आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्र्यंबक पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.

ऑनलाइन व्यवहार करताना विश्वसनीय असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देण्याचे टाळावे. ऑनलाइन व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

बिपीन शेवाळे, पोलिस निरीक्षक, त्र्यंबक पोलिस ठाणे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news