Farmer loan waiver: कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण आवश्यक

Farmer ID: ऑग्रिस्टॅक फार्मर आयडीही बंधनकारक
Farmer ID
Farmer IDPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.

Farmer ID
Farmer ID : ४ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी अर्जाना मंजुरी

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याची यादी २४ जुलैला प्राप्त झाली आहे. २५ जुलैपासून संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या कार्यालयांत तसेच तालुकास्तरीय बँक शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी संबंधित संस्था किंवा बँक शाखेत जाऊन यादीतील आपले नाव तपासावे आणि नावासमोरील 'विशिष्ट क्रमांक' प्राप्त करून घ्यावा. विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर जवळच्या 'आपले सरकार ई-सेवा केंद्र' किंवा 'कॉमन सर्व्हिस सेंटर' येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

Farmer ID
Farmer ID Mandatory Fertilizer Agristack: ॲग्रीस्टॅक योजनेत फार्मर आयडी सक्तीचा; खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑग्रिस्टॅक फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने ई-सेवा किंवा सीएससी केंद्रमार्फत नोंदणी करून घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, यासाठी कोणत्याही केंद्रावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news