

विंचूर(जि. नाशिक) : येथील शेतकरी आनंदा भास्करराव दरेकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात गेले असताना दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी डोकावून बघितले असता त्यांच्या शेताच्या कडेला लोन गंगा नदीकिनारी एक मृतदेह आढळला. दरेकर यांनी त्वरित लासलगाव पोलिस स्टेशनला कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तपासात मृतदेह बाबुराव प्रभाकर काळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
मृत व्यक्ती आठ ते दहा दिवसांपासून घरी आलेली नव्हती. कामानिमित्त ते कधीही बाहेर जात असल्यामुळे कोणालाच शंका आली नाही. घरापासून हाकेच्या अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी निफाड येथे पाठविला. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास लासलगाव सह पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या निरीक्षणाखाली पोलिस उपनिरीक्षक उदे, हवालदार घुमरे, पोलिस नाईक बिडकर, पोलिस शिपाई सांगळे हे करत आहेत.
हेही वाचा :