नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात मोदींची ओसरलेली लाट आणि इंडिया आघाडीचा वाढता प्रभाव नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातही चांगलाच दिसून आला. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा मविआतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे यांनी तब्बल १ लाख ६२ हजार १ मतांच्या फरकाने पराभव केला. तर दिंडोरीत भाजपच्या विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा नवख्या असलेल्या मविआतील शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १३ हजार १९९ मतांनी दणदणीत पराभव केला. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत गाजलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, छगन भुजबळ यांना उमेदवारी नाकारत ओढावून घेतलेली ओबीसी समाजाची नाराजी, आणि पक्ष फोडाफोडीचे राजकारण भाजपला भोवल्याची चर्चा मविआ उमेदवारांच्या विजयामुळे होत आहे.
मतदारसंघ विजयी पराभूत
नाशिक राजाभाऊ वाजे (उबाठा, शिवसेना गट) हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट)
दिंडोरी भास्कर भगरे (रा.कॉ. शरद पवार गट) डॉ. भारती पवार (भाजप)
नंदुरबार ॲड. गोवाल पाडवी (काँग्रेस) डॉ. हीना गावित (भाजप)
जळगाव स्मिता वाघ (भाजप) करण पवार (उबाठा, शिवसेना)
रावेर रक्षा खडसे (भाजप) श्रीराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
हेही वाचा: