Nashik NCP Dispute | गटनेतेपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादंग

Nashik NCP Dispute | प्रदेशाध्यक्षांचे बनावट पत्र करीत गटनेतेपदापासून रोखले : डॉ. पाटील
NCP
NCP Pudhari
Published on
Updated on
Summary
  1. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये गटनेतेपदावरून नवा वाद

  2. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही-शिक्क्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप

  3. ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा पक्ष नेतृत्वावर थेट सवाल

  4. सीमा ठाकरे यांची गटनेतेपदी नियुक्तीवरून बंडखोरीचे संकेत

  5. पक्षाकडून आरोप फेटाळत पक्षशिस्तीचा भंग झाल्याचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील गटनेतेपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात वाद सुरू झाला आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता करण्याचा शब्द दिला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर घाणेरडे राजकारण करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही शिक्यांचा गैरवापर करत कोणीतरी बनावट पत्र बनवत मला गटनेते पदापासून रोखले गेले असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या तथा नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी केला आहे.

NCP
Grape Export Nashik | नाशिकमधून द्राक्ष निर्यात संथ; सहा महिने लांबलेल्या पावसामुळे उत्पादनात 50 टक्के घट

अजित दादांनी मला शब्द दिला असताना सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या, असा सवाल करत राष्ट्रवादीच्या गटापासून द्र राहण्याचा तसेच प्रसंगी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा इशाराही डॉ. पाटील यांनी दिला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक निवडून आले.

पक्षात डॉ. पाटील या ज्येष्ठ असतानाही त्यांना डावलत पहिल्यांदाच निवडलेल्या सीमा ठाकरे यांना गटनेतेपद देण्यात आले आहे. त्यावरुन डॉ. पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवत गंभीर आरोप केले आहेत. डॉ. पाटील म्हणाल्या की, काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर दादांच्या आग्रहाखातर आणि त्यांनी दिलेल्या शब्दामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

दादांनी मला सहा टर्मच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांना गटनेते पदाची ग्वाही दिली होती. मात्र, दादांच्या दुर्देवी निधनानंतर नाशिकमध्ये गटनेते निवडीवरून संशयास्पद हालचाली सुरू झाल्या. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गटनेते पदाबाबत मी पत्र दिले नाही. ही स्कॅन कॉपी आहे. कुणाच्या तरी ऑफिसमधून हे पत्र गेले असेल.

२ तारखेला जेव्हा मी मुंबई कार्यालयात गेले, तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की थोड्याच वेळात मी तुला गटनेते पदाचे पत्र देतो. जेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणतात, की मी पत्र दिलेले नाही. मात्र, शहराध्यक्षांकडे असे पत्र आहे, याअर्थी त्यांच्या पत्राची बनावट कॉपी कोणी छापली का, त्यांच्या जुन्या पत्रावर नाव छापून कोणी टाकले का असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

NCP
Girish Mahajan | अजित पवार अपघात प्रकरणावर राजकीय वाद पेटला ! राऊतांचे वक्तव्य विकृत; गिरीश महाजनांचा घणाघात

डॉ. पाटील यांच्याकडून पक्षशिस्तीचा भंग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त अधिकृत पत्राद्वारे सीमा रंजन ठाकरे यांची महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाटील यांनी गटतेपदाच्या पत्रासंदर्भात केलेले आरोप हास्यास्पद असून पक्ष शिस्तीचा भंग करणारे आहेत. पदलालसेतून त्यांनी केलेले आरोप पक्षाची प्रतिमा मलिन करणारे असल्याने यासंदर्भातील अहवाल प्रदेश कार्यालयाला सादर केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय खैरनार यांनी दिली. डॉ.

पाटील यांनी ६ महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अन्य पक्षाकडून आलेल्या डॉ. पाटील या ज्येष्ठ नगरसेविका असल्या तरी राष्ट्रवादीत त्या नवीन असल्यामुळे तत्काळ मोठ्या पदाची अपेक्षा करणे गैरलागू होते. आरोप करण्यापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्षांशी किंवा अन्य वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करत खातरजमा करणे अपेक्षित होते. मात्र, केवळ महत्त्वाचे पद मिळवण्यासाठी काहीही करायचे या एकमेव उद्देशातून त्यांनी पक्षावर आरोप केले आहे. हा पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याची प्रतिक्रिया खैरनार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news