Grape Export Nashik | नाशिकमधून द्राक्ष निर्यात संथ; सहा महिने लांबलेल्या पावसामुळे उत्पादनात 50 टक्के घट

Grape Export Nashik | सहा महिने लांबलेल्या पावसाचा फटका; उत्पादनात ५० टक्के घट
Grape
GrapePudhari
Published on
Updated on
Summary
  1. सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका

  2. यंदा द्राक्ष उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट; निर्यात संथ गतीने

  3. आतापर्यंत नेदरलँड व जर्मनीला केवळ ३१३ कंटेनरमधून ४,२०२ मेट्रिक टन निर्यात

  4. स्थानिक बाजारात दर चांगले असल्याने शेतकरी निर्यातीपेक्षा देशांतर्गत विक्रीकडे वळले

  5. वाढती जागतिक मागणी असतानाही पुरवठा अपुरा राहण्याची शक्यता

लासलगाव : राकेश बोरा

सहा महिने सतत सुरू राहिलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला आहे. यंदा द्राक्ष उत्पादनात तब्बल ५० टक्क्‌यांहून अधिक घट झाल्याने नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात संथ गतीने सुरू आहे.

Grape
Goa Nightclub Fire | मृतांसाठी संशयितांकडून भरपाई रक्कम वसूल करा

युरोपमधील नेदरलँड व जर्मनी या देशांकडे आतापर्यंत ३१३ कंटेनरमधून सुमारे ४, २०२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली. वैशिष्ट्यपूर्ण चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक दर्जाच्या निकषांमुळे नाशिकच्या द्राक्षांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उपस्थिती अधोरेखित केली आहे.

मात्र निर्यातीचे प्रमाण अगदी नगण्य असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारे महत्त्वाचे फळ आहे. सन २०२४-२५ या हंगामात देशातून २ लाख ७१ हजार २५३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली असून त्यातून सुमारे ३ हजार ५० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले होते.

Grape
Vishwajit Rane | ...तर आप मॉडेल दिल्लीत पराभूत का झाले? 10 लाखांच्या विमा घोषणांवर विश्वजित राणेंची टीका

मात्र यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सलग सहा महिने झालेल्या पावसामुळे जवळपास ५० टक्क्‌यांहून अधिक द्राक्ष बागा बाधित झाल्या आहेत. उत्पादन घटल्याने अनेक शेतकरी स्थानिक बाजारपेठेतच द्राक्ष विक्रीला प्राधान्य देत असल्याने निर्यातीवर त्याचा विपरित परिणाम दिसून येत आहे.

यंदा महाराष्ट्रातून ३० हजार ४६० द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली असून, कर्नाटकातून ९ द्राक्षबागांची नोंदणी करण्यात आली आहे. वाढती जाग बाजारपेठांचा शोध घेतल्यास भारतीय द्राक्ष निर्यातीला मोठा वाव मिळू शकतो, असे मत निर्यातदार व्यक्त करत आहेत. हवामानातील सातत्याने होणारे बदल, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडचणींवर मात करत नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची परंपरा कायम ठेवली आहे.

यंदा बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम द्राक्ष निर्यातीवर होत आहे.

-कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ

66 यंदा सहा महिने सतत यादव सामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे. खर्च मात्र तसाच वाढलेला आहे.

- सुनील गवळी, द्राक्ष उत्पादक, ब्राह्मणगाव विंचूर

सद्य परिस्थितीमध्ये लोकल द्राक्षांचे दर खूप चांगले असल्याने शेतकरी 66 फारसा निर्यात करण्यास उत्सुक नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात चांगल्या प्रकारे सुरू होईल. मात्र लोकल द्राक्षांचे दर चांगले राहिल्यास तीदेखील घटण्याची शक्यता आहे. बाहेरच्या देशांमधून द्राक्षांना मोठी मागणी आहे. मात्र यावर्षी मागणीप्रमाणे पुरवठा होईल अशी शक्यता वाटत नाही.

- सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news