Nashik Onion News | नैसर्गिक शेतीतून कांद्याचे विक्रमी उत्पादन

नैसर्गिक शेतीतून कांद्याचे विक्रमी उत्पादन
onion
onionfile photo
Published on
Updated on

सटाणा : सुरेश बच्छाव

उन्हाळी कांदा उत्पादनात राज्यात आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यात यंदा सरासरी उत्पादनात निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीत चौंधाणे येथील नैसर्गिक शेतीच्या पुरस्कयां लक्ष्मीताई मोरे यांनी पेरणी पद्धतीने कांद्याचे विक्रमी उत्पादन घेत शेतकयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

सीताफळाच्या बागेत आंतरपीक म्हणून घेतलेल्या या कांद्याचे एकराला तब्बल २०० किंटलहून अधिक उत्पादन मिळाले आहे. विशेष म्हणजे अत्यल्प खर्च, रसायनमुक्त शेती आणि अवकाळी पावसाचा परिणाम न होणे ही या प्रयोगाची महत्वाची वैशिष्ट्ये उरली आहेत.

onion
Nashik tribal industrial cluster | आता अडीच कोटी रुपयांसाठी रखडले आदिवासी क्लस्टर

मोरे यांनी सरस्वती सीताफळ बागेतील सरीमध्ये स्थानिक बाजारातून उपलब्ध अडीच किलो बियाण्याची बेट पेरणी केली. स्प्रिंकलरद्वारे आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी देण्यात आले. घनजीवामृत वापरून तयार झालेली रोपे दीड ते पावणेदोन महिन्यांची झाल्यानंतर निंदणी व विरळणी करण्यात आली. संपूर्ण पीक कालावधीत कोणतेही रासायनिक खत, तणनाशक किंवा कीटकनाशक वापरण्यात आले नाही, दोन वेळा निंदणी करून पाण्यासोवत जीवामृत देण्यात आले. काढणीच्या टप्प्यात तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली, त्यामुळे पारंपरिक कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. मात्र, नैसर्गिक पद्धतीने घेतलेल्या या कांद्यावर त्याचा परिणाम झाला नाही.

साडेतीन महिन्यांत जवळपास सव्वादोनसे क्विंटल उत्पादन मिळाले. कांद्याचा जाकार ५५ ते ९० मिलिमीटर असून रंग, पापुद्रा आणि दर्जाही उत्तम असल्याने या कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, रसायनमुक्त उत्पादनाला मोठ्या शहरांमध्ये व मॉलमध्ये चांगली मागणी असली तरी स्थानिक बाजारात स्वतंत्र दर मिळत नाही. तरीही खर्च कमी व उत्पादन जास्त असल्याने ही पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

onion
Nashik News |निवडणुकांसाठी सेनेचा संपर्कमंत्री फॉर्म्युला

खत व्यवस्थापनासाठी जीवामृत, ताक, गूळ, शिजवलेला भात, गोवरीचे पाणी, पिकलेली केळी यांचा वापर करण्यात आला. सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी अंडी, ताक व गृळ मिसळून दोन वेळा फवारणी करण्यात आली. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचा दावा मोरे यांनी केला आहे. भविष्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय शेतकयांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news