Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका शाळांचा कायापालट; आता इंग्रजी शाळांच्या धर्तीवर येणार 'क्लब हाऊस' संकल्पना

Nashik Municipal Corporation | गणवेशासाठी अंदाजपत्रकात तरतूद करणार; नवीन चार शाळा इमारती उभारणार
Goa News
Goa News
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, नेतृत्वगुण आणि शिस्त रुजवण्यासाठी इंग्रजी शाळांच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या शाळांमध्येही 'क्लब हाउस' (हाउस सिस्टम) संकल्पना राबविली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.

Goa News
Nashik Crime Case | कायद्याच्या बालेकिल्ल्यात 'काहींना जेल, काहींना बेल'

इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध गृहांत उदाहरणार्थ साहस, शांती, एकता गटात विभागून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांद्वारे सामाजिक कौशल्ये विकसित करण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये एकता, बंधुत्व, शिस्त आणि प्रामाणिकपणाची भावना विकसित करणे हा यामागील हेतू आहे.

विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या घरांमध्ये विभागले जाते, ज्यांचे नेतृत्व हाउस मास्टर मिस्ट्रेस आणि कॅप्टन करतात. अभ्यासाव्यतिरिक्त आवडीनुसार क्लब असतात, जसे की, इंग्रजी क्लब भाषा कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी, क्रीडा क्लब एकाग्रता आणि निर्णय क्षमता सुधारण्यासाठी,

कला क्लब : सर्जनशील अभिव्यक्तीसाठी, इको/हेरिटेज क्लब पर्यावरण जागृती आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी. यासाठी रेड, ग्रीन, यलो हाउस अशी नावे देऊन विद्यार्थ्यांना त्या-त्या रंगाचे गणवेश दिली जातात.

Goa News
Malegaon Municipal Corporation | 'इस्लाम' ची बाजी; रणनीती यशस्वी

महापालिकाच्या शाळांमध्येही ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी शालेय गणवेशव्यतिरिक्त क्लब हाउस गणवेश विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याकरिता महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

शिक्षण विभागातर्फे १७१ कोटींचा मागणी प्रस्ताव

महापालिकेच्या आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील आकड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. शिक्षण विभागातर्फे १७१ कोटींचा मागणी प्रस्ताव आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे वृत्त आहे. यात चार ठिकाणी नवीन शाळा इमारत उभारली जाणार आहे. याशिवाय १८ शाळा इमारतींची दुरुस्ती, शिष्यवृत्ती योजना, अंशकालिन कर्मचाऱ्यांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news