

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीनंतर राज्याच्या नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम अखेर जाहीर केला. त्यानुसार नाशिक महापालिकेतील महापौर, उपमहापौर पदासाठीची येत्या ६ फेब्रुवारीला विशेष महासभा पार पडणार आहे.
या निवडीसाठी डॉ. गेडाम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च निर्देशांनुसार आयोगाकडून न्यायालयाच्या राज्य निवडणूक नाशिकसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत. निवडणूक निकालानंतर नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरसेवकपदाच्या १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागा भाजपच्या पदरात पडल्याने महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर भाजपचाच होणार हे यातून स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौर कधी निवडला जाईल, याची प्रतीक्षा लागून होती. २२ जानेवारी रोजी महापौर पदासाठीचे आरक्षण काढण्यात आले. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यानंतर राज्य सरकारने विभागीय आयुक्तांना महापालिकांमधील महापौर
भाजपसोबत शिंदेसेना, राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार
मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेवरून सुरू झालेल्या राजकीय हालचालींचे पडसाद नाशकातही उमटू लागले असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये सत्तापदांची वाटणी करताना नाशिक महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन्ही मित्र पक्षांना सत्तेत सहभागी करून घेण्याची तयारी भाजपने केली आहे.
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दोन्ही मित्र पक्षांच्या शहराध्यक्षांची भेट घेत सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्याचे नाशिक महापालिका निवडणुकीत १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागांवर विजय मिळवत भाजपने सलग दुसऱ्यांदा महापालिकेची एकहाती सत्ता काबीज केली आहे. महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार हे बहुमताच्या आकड्याने स्पष्ट झाले आहे.