.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वास्को : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव पालिकेने सुरू केलेल्या पे पार्किंग काही काळासाठी स्थगित ठेवण्याची सूचना पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुरगाव पालिकेला केल्याने पे पार्किंग काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यासंबंधी अंतिम निर्णय मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी सांगितले.
मुरगाव पालिकेने शहर भागातील वाहतुकीमध्ये शिस्त यावी यासाठी पे पार्किगसंबधीचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १४ जानेवारी २०२६ पासून करण्यात आली होती. येथील नम्रता सिलेक्शन ते रोशन महाल, उपजिल्हाधिकारी कार्यालय, पोष्ट ऑफिससमोर अशा ठिकाणी पे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पे पार्किंगसाठी कंत्राट देण्यात आले होते.
सदर कंत्राटदाराचे कामगार पे पार्किंगचे शुल्क गोळा करीत होते. या पे पार्किंगमुळे तेथे वेडीवाकडी ठेवण्यात येणारी वाहने दूर झाल्याने रस्ता वाहतुकीला सुरळीत झाला होता. तथापी पे पार्किंग ला काहीजणांनी विरोध केला होता. त्यामुळे पे पार्किंगमुळे वाद होण्याचे प्रकार होऊ लागले होते. पे पार्किंगऐवजी चारचाकी वाहनचालक आपली वाहने दुसरीकडे ठेऊ लागल्याने तेथे अतिरिक्त ताण आला होता.
पे पार्किंग नको असा सूर काहीजर्णाकडून व्यक्त होता. याप्रकरणी मंत्री गुदिन्हो यांनीही सध्या पे पार्किंगची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. सध्या वास्को शहर भागात सौंदर्याकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे वाहने उभी करण्यास वाहनचालकांना त्रास होईल. एकाचवेळी पे पार्किंग व सौंदयाकरणाचे काम करता येणार नाही. त्यामुळे मुरगाव पालिकेने पे पार्किंगचा निर्णय काही काळासाठी स्थगित कराबा, असे पत्र त्यांनी मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर पालिकेची बैठक बोलावणार नगराध्यक्ष बोरकर नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनीही सदर पे पार्किंग तात्पुरती स्वरुपात थांबण्यात आली आहे. यासंबंधी मुरगाव पालिका मंडळाची बैठक बोलाविण्यात येणार आहे. त्या बैठकीसमोर सदर प्रश्न ठेवण्यात येऊन चर्चा करण्यात येईल, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.
सौंदर्याकरणाचे काम पूर्ण होण्यास अंदाजे एक वर्ष लागेल. त्यानंतर पे पार्किंगसंबंधीचा विचार करता येईल. पार्किंगसाठी विभाग सीमांकन करण्याची गरज आहे.
- माविन गुदिन्हो, मंत्री