Nashik Property Tax Rebate Scheme | करसवलत योजनेतून मनपा मालामाल

Nashik Property Tax Rebate Scheme | ११९.४९ कोटींची घरपट्टी वसूल; योजनेचा २.४१ लाख करदात्यांनी घेतला लाभ
Baramati Property Tax
भाडेकरू नसताना वाढीव घरपट्टीची नोटीसCanva
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरपट्टीच्या नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या तिमाही कर सवलत योजनेमुळे नाशिक महापालिका 'मालामाल' झाली आहे. या योजनेमुळे एप्रिल ते जून या तीनच महिन्यांत तब्बल ११९.४९ कोटींची घरपट्टी वसूल झाली आहे. या योजनेत तब्बल २.४१ लाख मिळकतधारकांनी सहभागी होत ५.२२ कोटींची करसवलत मिळविली हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

Baramati Property Tax
Sambhajinagar News : कर्जमुक्तीसाठी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकरी पात्र

जीएसटी अनुदानापोटी मिळणाऱ्या महसुलाखालोखाल घरपट्टी व पाणीपट्टीतून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. कर विभागाकडे पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे घरपट्टीची देयके मिळकतधारकांकडे निर्धारित मुदतीत पोहोचू न शकल्याने घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा साडेसातशे कोटींवर गेला आहे.

घरपट्टी देयकवाटपासाठी आता महापालिकेने खासगीकरणातून सेवा घेतली असली तरी कर विभागाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी आणखी काही काळ खर्ची होणार आहे. त्यासाठी थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबवितानाच नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी कर सवलत योजना राबविली जाते.

या योजनेंतर्गत एप्रिल महिन्यात घरपट्टीची संपूर्ण रक्कम भरणाऱ्या करदात्यांना आठ टक्के, मे मध्ये पाच टक्के तर जून महिन्यात ३ टक्के सवलत देण्यात आली. त्याचबरोबर सोलर युनिट असलेल्या मिळकतधारकांना एक टक्का अतिरिक्त सवलत दिली गेली.

Baramati Property Tax
Maharashtra Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या जाचक अटींवर शेतकरी संतप्त; राज्यभर आंदोलनाची तयारी

एप्रिल महिन्यात सर्वाधिक १ लाख ५६ हजार ८०९ मिळकतधारकांनी ८ टक्के सवलतीचा लाभ घेत ७७.१६ कोटींची घरपट्टी जमा केली. त्या खालोखाल मे महिन्यात ५३ हजार ७६० मिळकतधारकांनी ५ टक्के सवलतीचा लाभ घेत २५.३९ कोटींची घरपट्टी महापालिकेच्या तिजोरीत जमा केली तर जूनच्या कर सवलतीच्या शेवटच्या महिन्यात ३० हजार ९१० मिळकतधारकांनी तीन टक्के सवलतीचा लाभ घेत १६.९३ कोटींची घरपट्टी जमा केली आहे.

सिडको अव्वल तर पश्चिमचा शेवटचा क्रमांक

कर सवलत योजनेत सिडको विभाग अव्वल ठरला आहे. या विभागातून सर्वाधिक ६३ हजार ९०४ मिळकतधारकांनी तब्बल २४.९७ कोटींची घरपट्टी भरत तब्बल १.०८ कोटींची करसवलत मिळविली आहे. त्या खालोखाल पंचवटी विभागातील ४४ हजार ३७मिळकतधारकांनी २१.८१ कोटींची घरपट्टी भरत ८८.४३ लाखांची करसवलत मिळविली आहे.

नाशिकरोड विभागातील ४३ हजार ८२० मिळकतधारकांनी १९.३९ कोटी घरपट्टी भरत ७४.४४ लाखांची करसवलत मिळविली आहे. नाशिक पूर्व विभागातील ४० हजार १०४ मिळकतधारकांनी १८.८२ कोटींची घरपट्टी भरत ८६.२३ लाखांची करसवलत मिळविली आहे. सातपूर विभागातून २७,७०८ मिळकत धारकांनी १४.४९ कोटी घरपट्टी भरत ६४.२४ लाखांची करसवलत मिळविली आहे. तर नाशिक पश्चिम विभागातील २१,९०६ मिळकतधारकांनी १९.९९ कोटींची घरपट्टी भरत १ कोटींची करसवलत पदरात पाडून घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news