Sambhajinagar News : कर्जमुक्तीसाठी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकरी पात्र

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाची माहिती, १६३२ कोटी रुपयांचे कर्ज होणार माफ
Farming
FarmingPudhari
Published on
Updated on

1.80 lakh farmers in the district eligible for loan waiver

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शासनाने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ खातेदार शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास पात्र ठरले आहेत. या सर्वांचे मिळून १६३२ कोटी १२ लाख रुपयांचे कर्जमाफ होणार आहे.

Farming
Farmer loan waiver‌ : ‘कर्जमुक्ती‌’बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी कर्जमाफीबाबतची माहिती दिली आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ८० हजार १७६ पात्र खातेधारक असून त्यांची एकत्रित रक्कम १६३२ कोटी १२ लाख रुपये इतकी आहे. तथापि, जिल्ह्यात अद्याप ७१२ खातेदार असे आहेत की ज्यांचे बँक खाते आधार संलग्र नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यात बँक ऑफ इंडिया १, बँक ऑफ बडोदा ४८४, बँक ऑफ महाराष्ट्र १६२, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया २, जिल्हा मध्यवर्ती बँक ५, महाराष्ट्र ग्रामिण बँक १२, स्टेट बँक ऑफ इंडिया ४०, युनियन बैंक ऑफ इंडिया ६ असे एकूण ७१२ खातेदार आहेत.

या खातेदारांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आधार संलनिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले आहे. अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करण्यात आले असून त्याचे हप्ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असतील, तर अशा शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Farming
Farm loan waiver| कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम

कर्जमाफीचे निकष

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीची कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. यासाठी शेतीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

त्यांना ५० हजारांचा लाभ

ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. थकबाकी दोन लाखांपेक्षा जास्त असल्यास ?

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनाही या योजनेचा लाभमिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ओटीएस अंतर्गत अदा केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news