Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत आता 'सभागृहनेते' पदासाठी भाजपमध्ये चुरस; इच्छुकांच्या लॉबिंगला वेग

Nashik Municipal Corporation | महापौर, उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर आता महापालिकेतील सभागृहनेते पदासाठी भाजपमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे.
Nashik Municipal Election
Nashik Municipal ElectionPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापौर, उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर आता महापालिकेतील सभागृहनेते पदासाठी भाजपमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे. माजी उपमहापौर गुरमित बग्गा, माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील व स्थायी समितीचे माजी सभापती शाहू खैरे या दिग्गज नगरसेवकांची या पदासाठी चर्चा असली तरी निष्ठावंतांची नाराजी टाळण्यासाठी पक्षाकडून सावध पावले उचलली जात असल्याचे समजते.

Nashik Municipal Election
Marathi Language Row | मराठीला गावठी भाषा म्हणणाऱ्या परप्रांतीयाला चोप

नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा भाजपने एकहाती सत्ता मिळवत नवा इतिहास रचला आहे. १२२ पैकी भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणूकपश्चात शिवसेनेशी युतीचा निर्णय भाजपने घेतल्याने शिवसेनेला उपमहापौरपदाची लॉटरी लागली आहे.

महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे यांची निवड झाली आहे. आता स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासोबतच सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती केली जाणे अपेक्षित आहे.

निवडणूक काळात आयारामांना पायघड्या घालत निष्ठावंतांची उमेदवारी डावलली गेल्याचा भाजपमधील निष्ठावंतांचा राग अद्यापही शमलेला नाही. त्यातच सत्तापदांच्या वाटणीत आयारामांना संधी दिली जाऊ नये, अशी भूमिका आता निष्ठावंतांमधून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

सभागृहनेता हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्ताधारी व विरोधकांमधील दुवा तसेच धोरणात्मक विषयावर सभागृहाचा कल मांडण्याचे महत्त्वाचे काम या पदावरील व्यक्तीला करावे लागते. त्यामुळे प्रतिष्ठा, जबाबदारीच्या पदावर बसण्यासाठी भाजपमध्ये चुरस असल्याचे दिसून येत आहे.

Nashik Municipal Election
CREDAI Nashik Metro CSR | क्रेडाई वनीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ

भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष

सभागृहनेतेपदासाठी भाजपमध्ये अनेक दिग्गज इच्छुक आहेत. शिवसेना उबाठातून बाहेर पडल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत. दिनकर पाटील हेही मनसेतून भाजपमध्ये आले आहेत. तर काँग्रेसचे गटनेतेपद भूषविलेले शाहू खैरे हेही भाजपमध्ये आहेत.

मनसेच्या सत्ताकाळात अपक्ष निवडून उपमहापौर राहिलेले गुरमित बग्गा हे सध्या भाजपच्या तिकिटावर निवडून आले. यांची नावे सभागृहनेतेपदासाठी चर्चेत आहेत. मात्र, निष्ठावंत जुन्या नगरसेवकांचा आयारामांना सत्तापदे देण्यास विरोध असल्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news