CREDAI Nashik Metro CSR | क्रेडाई वनीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ

CREDAI Nashik Metro CSR | क्रेडाईच्या सीएसआर फाउंडेशन आणि सदस्यांच्या नेटवर्कद्वारे राबविल्या जात असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेच्या पश्चिम घाटातील वनीकरणासाठीच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
CREDAI Nashik Metro CSR
CREDAI Nashik Metro CSR
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

क्रेडाईच्या सीएसआर फाउंडेशन आणि सदस्यांच्या नेटवर्कद्वारे राबविल्या जात असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेच्या पश्चिम घाटातील वनीकरणासाठीच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

CREDAI Nashik Metro CSR
Maharashtra Politics | "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा मनसे प्रमुखांना टोला

दिंडोरी तालुक्यातील करंजगाव येथून ही मोहीम राबविली जाणार आहे. या २५ मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील गावांमध्ये सुमारे २० लाख रोपे लावली जातील, अशी माहिती क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर पटेल यांनी दिली आहे. याप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले, या मोहिमेंतर्गत सुमारे नऊ हजार एकर झीज झालेल्या वन्यजमिनीचे पुनर्भरण करण्यात येईल.

या मोहिमेसाठी राह फाउंडेशन आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. यासाठी क्रेडाईतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक अनुबंध करार करण्यात आला असून, याचा उद्देश राज्य शासनाच्या निर्देशासोबत समन्वय साधणे असा आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत स्थानिक प्रजातींच्या लागवडीद्वारे साडेतीन हजार एकरहून अधिक जमीन पुनर्संचयित केली गेली आहे.

या अंतर्गत प्रतिएकर अंदाजे २०० रोपे लावली जातात. बहुवर्षीय देखभाल, थर्ड पार्टी ऑडिट आणि समाजाचा सक्रिय सहभाग KOCHARGAON यामुळे शाश्वत पर्यावरणीय पुनरुत्पादन, भूजल पुनर्भरण, मातीचे आरोग्य सुधारणे आणि स्थानिक समुदायांना शाश्वत उपजीविकेचे लाभ मिळतात असेही त्यांनी सांगितले.

याच कार्यक्रमात बांधकाम क्षेत्राचा पाया असलेल्या बांधकाम कामगारांना आपल्या आरपीएल उपक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले गेले. या प्रशिक्षणांतर्गत गवंडी काम, प्लास्टरिंग, टायलिंग, शटरिंग, बार बेंडिंग, स्टील बांधणे यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

CREDAI Nashik Metro CSR
Panchkalyanak Mahotsav | धर्म आचरणाअभावी देशात समस्या वाढल्या

पुढील एक वर्षात सुमारे ५० हजार प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच बांधकाम क्षेत्रातील विविध बाबींचे प्रशिक्षणदेखील क्रेडाईतर्फे देण्यात येईल, यासाठी आयआयएम अहमदाबाद व बंगळुरू यांच्यासोबत करार करण्यात आला आहे.

याप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, आयपीपी कृणाल पाटील, मनोज खिंवसरा, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, समिती सदस्य विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, सहयोगी सदस्य सतीश मोरे, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग सह समन्वयक अजिंक्य नहार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news