Marathi Language Row | मराठीला गावठी भाषा म्हणणाऱ्या परप्रांतीयाला चोप

Marathi Language Row | मराठी गावठी भाषा आहे, हिंदीतच बोलावे लागेल, अशी विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी वर्गात सक्ती करणाऱ्या परप्रांतीय शिक्षकाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला.
Nashik news
Nashik news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठी गावठी भाषा आहे, हिंदीतच बोलावे लागेल, अशी विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी वर्गात सक्ती करणाऱ्या परप्रांतीय शिक्षकाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. या शिक्षकाला 'मराठीत बोल' असे म्हणत पदाधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ त्याच्या कानशिलात लगावल्याने, या शिक्षकाची चांगलीच भंबेरी उडाली होती.

Nashik news
CREDAI Nashik Metro CSR | क्रेडाई वनीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ

कॅनडा कॉर्नर येथील एका खासगी क्लासमध्ये परप्रांतीय शिक्षक मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बुधवारी (दि.११) मनसे पदाधिकाऱ्यांनी शिकवणी वर्गात धडक दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास मनाई केली जात असल्याच्या तक्रारी केल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांना जाब विचारला.

क्लासमधील जवळपास सर्वच शिक्षक परप्रांतीय असल्याने, त्यांना मराठीत बोलता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शिक्षकांची हिंदी नीट समजत नसल्याची बाबही समोर आली.

त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भाषेवरून वाद नित्याचेच झाले होते. त्यात 'शिक्षकांकडून मराठीमध्ये शिकवणार नाही, हिंदीमध्ये शिकायचे असेल तर शिका. हिंदी कळत नसेल तर घरी बसा.तुमची मराठी आम्हाला येत नाही.

तुम्हाला शिकायचे असेल तर हिंदीमध्येच शिकवले जाईल.' अशी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर अरेरावी केली जात होती. याबाबतच्या विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी क्लासला धडक भेट देत, संबंधित शिक्षकांची कानउघाडणी केली.

Nashik news
Panchkalyanak Mahotsav | धर्म आचरणाअभावी देशात समस्या वाढल्या

तसेच परप्रांतीय शिक्षकाला चोप देत 'मराठी गावठी भाषा आहे काय?' असा जाब विचारला. यावेळी संबंधित शिक्षकाला मराठी संवाद साधण्यास सांगितले, मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. महराष्ट्रात येता, पण मराठी शिकत नाही, असे म्हणत पदाधिकाऱ्यांनी शिक्षकाच्या कानशिलात लगावल्या.

तसेच संबंधित क्लासचालकाने मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष ललित वाघ, मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई, बाजीराव मते, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे, शहर संघटक अक्षय कोंबडे, रोहित उगावकर, मेघराज नवले, मनोज सावंत, मयूर पाटील, दर्शन बोरसे, मयूर जैन आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news