Nashik | ‘आई – बाबा आमचा हट्ट पुरवा, न चुकता मतदान करा’.. विद्यार्थ्यांचे आवाहन

पेठ: उस्थळे आश्रमशाळेत मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मतदान जागृतीविषयी विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिलेले पत्र.
पेठ: उस्थळे आश्रमशाळेत मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मतदान जागृतीविषयी विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिलेले पत्र.

पेठ : पुढारी वृत्तसेवा

आई – बाबा आमचा हट्ट पुरवा, न चुकता मतदान करा. मतदान करणे लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असा जनजागृतीपर संदेश पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी पत्रातून आपल्या पालकांना दिला. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात पेठ तालुक्यातील 27,350 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली सुमारे 50 ते 60 पत्रे अतिशय आशयपूर्ण आणि औचित्याला अनुरूप अशी असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीतून अनेक उपाययोजना समोर आल्या आहेत. या पत्रांचा शिक्षण विभागाकडून संग्रह केला जाणार आहे. गटशिक्षणाधिकारी प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 227 शाळांत हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news