Nashik | मॉर्निंग वॉक, विथ पोलिस : ‘पोलिस नागरिक संवाद’

नाशिक : जॉगिंग ट्रॅकवर नागिरकांशी संवाद साधताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : जॉगिंग ट्रॅकवर नागिरकांशी संवाद साधताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक. (छाया: हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर सुरक्षेसाठी नागरिकांसोबत संवाद (Police-Citizen Interaction) वाढवून त्यांच्यामार्फत समस्या, तक्रारी व गुन्हेगारांविरोधातील माहिती संकलित करण्यावर शहर पोलिसांनी भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी शहरातील जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांमध्ये मिसळून त्यांचे मत जाणून घेतले. त्यात नागरिकांनी टवाळखोरी, जॉगिंग ट्रॅकवर रात्रीच्या वेळी होणाऱ्या मद्यपींच्या पार्टी, शहरात पार्किंगची उद्भवणारी समस्या, वाहतुकीस अडथळ्याची कारणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. पोलिसांनीही या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. (Police-Citizen Interaction)

शनिवारी (दि.२४) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 'मॉर्निंग वॉक, विथ पोलिस' या संकल्पनेस सुरुवात केली. सकाळी सात वाजता शहरातील पोलिस ठाणेनिहाय ३५ जॉगिंग ट्रॅकवर हा उपक्रम राबविण्यात आला. कर्णिक यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे व वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांनी गोल्फ क्लब मैदानात नागरिकांशी संवाद साधला. तर शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तेथील सहायक आयुक्तांसह स्थानिक वरिष्ठ पोलिस निरीक्षक व अंमलदारांनी नागरिकांशी चर्चा केली. यावेळी रात्री उशिरा मैदाने, जॉगिंग ट्रॅकवर मद्यपींची बैठक रंगणे, मद्यपींचा वावर असणे, मैदानांभोवती भाजी-फळ व इतर विक्रेत्यांचा वेढा असतो. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, शहरात पार्किंगची समस्या असल्याने वाहतूक कोंडीही वाढली आहे. वाहतूक नियम कोणी पाळत नाही, रिक्षाचालक बेशिस्त असून, त्यांच्यामुळेही वाहतूक कोंडी व अपघात होतात, असा आरोप नागरिकांनी केला. तसेच खासगी वाहनांमध्ये पोलिस पाट्या लावून अनेक जण फिरतात अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या. तसेच सूचना व तक्रारी ऐकून घेण्यासाठी पोलिस स्वत: आल्याचे पाहून नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले. पुढील टप्प्यात सायंकाळीदेखील पोलिस संवाद साधणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले. तर हा उपक्रम महिन्यातून एकदा होणार असून, प्रत्येक जॉगिंग ट्रॅककरिता नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे. (Police-Citizen Interaction)

मोजक्याच नागरिकांचा वेढा
जॉगिंग ट्रॅकवर पोलिस अधिकारी दाखल झाल्यानंतर त्यांच्याभोवती नागरिकांनी गराडा केला. मात्र, मोजक्याच नागरिकांनी अधिकाऱ्यांभोवती कडे केल्याने इतर नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडता आले नसल्याचे चित्र दिसले. काही नागरिकांनी शेवटपर्यंत अधिकाऱ्यांची साथ न सोडल्याने इतरांचा हिरमोड झाला.

समस्या ऐकून पोलिस निःशब्द (Police-Citizen Interaction)
पोलिसांचा शहरातील कायदा व सुव्यवस्थेशी निगडित तक्रारी, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न होता. मात्र बहुतांश नागरिकांनी मैदानावर पाणी मारले जात नाही, स्ट्रीट लाइट बंद असतात, स्वच्छता नसते अशा तक्रारी सांगितल्या. मात्र, या तक्रारी महापालिकेशी निगडित असल्याने पोलिस काही वेळ निःशब्द झाले. पोलिसांनी त्यांची भूमिका सांगत पोलिसांशी निगडित समस्या, तक्रारी किंवा माहिती देण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी तक्रारींचा सूर बदलल्याचे काही ठिकाणी पाहावयास मिळाले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news