Nashik Municipal Corporation | महापौर ऑन फिल्ड राबवला 'डीप क्लीन ड्राइव्ह'

Nashik Municipal Corporation | नाशिककरांना स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
nashik news
nashik news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी शनिवारी (दि.१४) ऑन फिल्ड उतरत 'डीप क्लीन ड्राइव्ह' राबवला. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांचे सामाजिक कर्तव्य आहे.

nashik news
Goa POCSO Cases Pending | न्यायालयात 158 पोक्सो प्रकरणे प्रलंबित

सिंहस्थ, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहर देश-विदेशातील भाविकांसमोर आदर्श ठरेल, यासाठी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. नाशिक मनपा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मुंबई नाका परिसरात 'डीप क्लीन ड्राइव्ह' हा स्वच्छता जनजागृती उपक्रम राबवला.

यात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त आयुक्त करिश्मा नायर, नगरसेवक सुरेश पाटील, राजेंद्र आहेर, सागर लामखेडे, सुप्रिया खोडे, प्रतिभा पवार, सीमा पवार, चित्रा तांदळे, उपआयुक्त अजित निकत यांनी सहभाग नोंदवला. सकाळी ८.३०च्या सुमारास स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

nashik news
Chincholi Farmers Protest | तोडगा न काढल्यास बांधकाम विभागासमोर आंदोलन : कडू

मुंबई नाका ते ट्रॅक्टर हाउसपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात न्हाईचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी श्रमदान करत परिसरातील कचरा संकलन, रस्ते स्वच्छता, गटार सफाई तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. या मोहिमेत न्हाईचे ४ डंपर, ३ ट्रॅक्टर, २ जॅकब तसेच मनपाच्या ५ घंटागाड्यांमार्फत कचरा संकलित करण्यात आला. एलईडी व्हॅनद्वारे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन,

प्लास्टिकमुक्त परिसर व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. उपक्रमात सहभागींसाठी मास्क व हँडग्लोव्हजचे वितरण करत आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना पाळण्यात आल्या. यावेळी राजेश पंडित, निशिकांत पगारे, चंद्रकिशोर पाटील यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

'स्वच्छ शहर, स्वस्थ शहर स्वच्छतेचा महाकुंभ' या संकल्पनेला साकार करण्यासाठी नागरिकांनी सातत्याने सहभाग नोंदवावा. नाशिकचे चित्र स्वच्छ शहर म्हणून समोर यावे यासाठी प्रत्येक नाशिककरांनी प्रयत्न करायला हवेत.

- हिमगौरी आहेर-आडके, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news