Nashik News | दिव्य महाआरतीने तेजोमय झाला गोदाघाट

Nashik News | 1,111 महिलांचा सहभाग : गोदाजन्मोत्सवाचा अलोट उत्साह; गोदेच्या दुतर्फा नाशिककरांची गर्दी
Nashik News | दिव्य महाआरतीने तेजोमय झाला गोदाघाट
Nashik News | दिव्य महाआरतीने तेजोमय झाला गोदाघाटPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकत्रितपणे १,१११ महिलांनी प्रथमच महागोदा आरती केल्याने गोदाघाट लख्ख प्रकाशात तेजोमय झाला होता. गोदामातेच्या आरतीवर अत्यंत शिस्तबद्ध आणि लयबद्ध आरती करत गोदाजन्मोत्सव साजरा केला. हा अत्यंत विलोभनीय सोहळा हजारो नाशिककरांनी गोदेचे दुतर्फा तुफान गर्दी करत 'याचि देही याचि डोळा' अनुभवला. केंद्रीय सांस्कृतिक कार्य व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या आवाहनानंतर नाशिककरांनी आपल्या मोबाइलची टॉर्च सुरू करत, या अत्यंत आगळ्यावेगळ्या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला.

Nashik News | दिव्य महाआरतीने तेजोमय झाला गोदाघाट
Nashik news | एकलव्य निवासी शाळा प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या प्रमुख अतिथी होत्या. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी उपस्थित होते.

सोहळ्यात पद्मश्री सुभाष शर्मा यांना 'रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार' व वेदमूर्ती पंडित राजेश्वरशास्त्री भालचंद्रशास्त्री जोशी यांना 'रामतीर्थ गोदा प्राच्यविद्या प्रकाश' या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी शेखावत यांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने येथील लोक भाग्यवान आहेत. भारत हा बहुआयामी संस्कृती असलेला देश आहे.

या देशाला समजून घ्यायचे असेल तर कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतरच या देशाचे वैशिष्टचे समजत असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरीची स्वच्छता ही सर्वांचीच प्राथमिकता असायला हवी, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आताच्या पिढीला 'करिअर विथ कॅरेक्टर' ही संकल्पना समजून सांगण्याची गरज आहे.

कारण करिअर शुद्ध मनाने केल्यास भ्रष्टाचारमुक्त देश होण्यास मदत होईल. चांगले आचारण हे संस्कृतीचे आचारण करण्यासमान असल्याचे त्यांनी सांगितले. पद्मश्री सुभाष शर्मा यांनी गोदावरीचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी भूर्गभात पाण्याची पातळी आहे. त्यासाठी वाढवण्याची गरज आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शेतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Nashik News | दिव्य महाआरतीने तेजोमय झाला गोदाघाट
Vasco Traffic Diversion | अवजड वाहतूक वळविल्याने खतनिर्मिती रोडावली

विक्रमी महागोदा आरती

तब्बल १,१११ महिलांनी प्रथमच एकत्रित येत अशा प्रकारची आरती केल्याने हा एक विक्रम ठरला. अत्यंत लयबद्ध पद्धतीने महिलांनी आरती केली. यात युवती तसेच वयोवृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. गोदावरी आरतीच्या चालीवर केलेली आरती, डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली

पोलिस आयुक्तांचा सपत्नीक सत्कार

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा सोहळ्यात सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाल, पुष्पमाला आणि श्रीरामाची मूर्ती प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला. शहराची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्तांकडून सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार काढण्यात आले.

पुरोहित संघाची आरती अन् पोलिसांची धावाधाव

सोहळा सुरू असताना पुरोहित संघाची आरती सुरू झाल्याने पोलिसांची एकच धावाधाव दिसून आली. पुरोहित संघाने ध्वनिक्षेपकावर आरती सुरू केल्याने कार्यक्रमात व्यत्यय येत होता. सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह पुरोहित संघाच्या आरतीकडे धाव घेतली. त्यानंतर पुरोहित संघाच्या ध्वनिक्षेपाचा आवाज कमी केला गेला. यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त राबवण्यात आला होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः बंदोबस्ताचा आढावा घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news