Vasco Traffic Diversion | अवजड वाहतूक वळविल्याने खतनिर्मिती रोडावली

Vasco Traffic Diversion | दाबोळी ते बिर्ला वेर्णा चौक दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे होतोय परिणाम
Vasco Traffic Diversion
Vasco Traffic Diversion
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी दाबोळी ते बिर्ला वेर्णा चौक दरम्यानच्या महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक कुठ्ठाळीमार्गे वळविण्यात आल्याने झुआरीनगरच्या पराव्दीप फॉस्पेटस् लिमिटेडसमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आल्याने सदर कंपनीच्या अमोनिया, फॉस्परिक असिडवाहू अवजड वाहनांना सुमारे ४०-४५ किलोमीटरचा वळसा घेऊन ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे खत निर्मितीवर परिणाम होऊ लागला आहे.

Vasco Traffic Diversion
Goa Crime News| ... अखेर सुन्नी गुलिस्तान मशीद सील

याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काहीतरी तोडगा काढावा, अशी विनंती कंपनीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी कंपनीच्या अधिकारी वर्गाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिस निरीक्षक आर्वितो रॉड्रिग्ज पाहणी केली. दाबोळी-बोगमाळो चौक ते एमईएस चौक या दरम्यान उड्डाण पुल बांधण्यात येत आहे.

या पुलाचे काम वेगाने व्हावे यासाठी दाबोळी विमानतळ चौक ते बिर्ला वेर्णा चौक दरम्यानची अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. मुरगाव बंदरातून व इतर ठिकाणाहून येणारी अवजड वाहने दाबोळी विमानतळ चौकातून चिखली मार्गे कुठ्ठाळी चौकात जातात. तर वेर्णा येथून येणारी वाहने कुठ्ठाळी चौकातून चिखली चौक, विमानतळ चौक येथून ग्रेड सेपेरेटरमार्गे महामार्गावर येऊन मुरगाव बंदरात जातात.

Vasco Traffic Diversion
Goa News | राज्यात दरवर्षी सरासरी 70 नवे कुष्ठरोगी

हलकी वाहने, बस वगैरे विशाल मार्टसमोरून वळविण्यात येऊन ती जयराम नगरच्या अंतर्गत रस्त्यावरून वालिस गरेज चौकात येऊन महामार्गावरून बिर्ला-वेर्णा चौकात जातात. वास्कोकडे येणारी वाहने नेव्हल डेपोसमोरच्या अंतर्गत रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. तेथून ती वाहने विशाल मार्टसमोरच्या रस्त्याने महामार्गावर येतात. अशी प्रकारे तेथील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे, पूर्वी टैंकर विमानतळ चौक, बोगमाळो चौक, एमईएस चौक, झुआरीनगर या मागनि वाहतूक करीत होते.

वाहतूक वळविल्याने वेळ अधिक खर्च होतो, टैंकराच्या फेरयावर परिणाम झाला आहे. त्यामुळे खतासाठी लागणारे अमोनिया, फॉस्परिक अॅसिडचा पुरवठा पूर्वीप्रमाणे वेळेवर होत नसल्याने खत निर्मितीवर परिणाम होऊ लागला असल्याचे कंपनीच्या एका सूत्राने सांगितले. याप्रकरणी काही तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती, टँकरची वाहतूक पूर्वीच्या मार्गावरून व्हावी यासाठी एक खास पॅसेज करून देण्यात यावा, असा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी पाहणी करण्यात आल्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यात आली. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news