Nashik Leopard : सातपूरला मळे परिसरात बिबट्या जेरबंद, अजून दोन बिबट्यांचा शोध सुरु
सातपूर : पुढारी वृत्तसेवा- सातपूर मळे परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांपैकी एकाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आले आहे. बजरंगनगर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि.२९) रात्री ९ वाजता हा बिबट्या अडकला. त्यामुळे स्थानिकांसह अण्णाचा मळा भागातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
परंतु, अद्यापही अजून दोन बिबट्यांचा वावर कायम असल्याने धोका कायम आहे. त्यांच्या बंदोबस्ताठी पुन्हा पिंजरे लावण्यात आले असल्याचे वनरक्षक अनिल अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात हाॅटेल्स, मटण मार्केट, मच्छी विक्रेते असल्याने बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी वासाने येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नंदिनी नदी परिसर, दाट मळे परिसर, नैसर्गिक अधिवासामुळे बिबट्यास लपण्यास येथे भरपूर सुरक्षित जागा आहे. वनविभागाने इतर बिबट्यांनाही जेरबंद करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा :

