

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील कासारे-छाईल रस्त्यालगत असलेल्या राजेंद्र देसले यांच्या मालकीच्या शेतात बुधवारी (दि.२२) सकाळी ९ च्या सुमारास बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला.
याची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी यांचे निर्देशानुसार वन विभागाचे कर्मचारी ओंकार ढोले, तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची स्थिती विचारात घेऊन त्याला बेशुद्ध न करता जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक साहित्याच्या मदतीने कौशल्यपूर्णरित्या त्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला पिंपळनेर येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॅा.मंगेश हेमाडे यांनी तपासणी केली असता त्यास पुढील उपचारांसाठी टीटीसी, नाशिक येथे पाठविण्यात आले.
ही कामगिरी उपवनसंरक्षक,मो.बा. नाईकवाडी, सहायक वनसंरक्षक योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले, वनपाल संदीप मंडलिक, रामदास चौरे, दयाराम सोनवणे वनरक्षक अनिल घरटे, देविदास देसाई, गुलाब बारीस, राकेश पावरा, आकाश पावरा, लखन पावरा, सुरेश पावरा, रंजना पावरा, ममता पावरा, वनमजूर बाजीराव पवार, मधुकर कुवर, उज्जैन चौधरी यांनी पार पाडली.