Leopard News : अकोलादेव, काळेगावात बिबट्या दिसल्याने भीती

टेंभुर्णी : वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
Leopard News
Leopard News : अकोलादेव, काळेगावात बिबट्या दिसल्याने भीती File Photo
Published on
Updated on

Fears after leopard sighting in Akoladev, Kalegaon

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव व काळेगाव परिसरात बिबट्या दिसल्याने दहशत पसरली आहे. वनविभागाच्या वतीने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leopard News
Farmer ID : फार्मर आयडी प्रमाणित न झाल्याने शेतकऱ्यांत संताप

बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जाफराबादवरून देऊळगावर-ाजा येणाऱ्या कारचालक नंदन खेडेकरला राजूर फाट्यावर वाघ दिसला. हा क्षण कारच्या डॅश कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाल्याचे त्यांनी सांगितले. तर काळेगाव येथे शेतात सोयाबीन काढत असलेले पांडुरंग चव्हाण, शेख अस्लम यांना बिबट्या दिसला आहे. बिबट्याला पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली होती. ते गावाकडे पळत येऊन ही माहिती सरपंच वसंतराव चव्हाण, उप सरपंच शेख वाहेद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय चव्हाण यांना माहिती दिली. तोपर्यंत बिबट्यांनी चार रानडुकरांचा फडशा पाडला होता. काळेगाव कुंभारझरी येथे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे.

तसेच येथे खडकपूर्णा धरण परीक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. हा बिबट्या येथूनच आला असावा असा लोकांचा अंदाज आहे. सध्या सोयाबीन सोंगणी, कपाशीला व इतर पिकाला पाणी देण्याची लगबग सुरू आहे. त्यातच या परिसरात बिबट्या वावरत असल्याने महिला, शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याने शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. यामुळे काळेगाव येथील सरपंच वसंतराव चव्हाण यांनी येथील वनविभागाशी संपर्क साधून व लेखी पत्र देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून काळेगाव येथील बिबट्यांचा शोध घेण्यासाठी जालना वनविभागाचे वनरक्षक संभाजी हटकर यांनी पाहणी केली. असता त्यांना बिबट्याच असल्याचे पायांचे ठसे मिळून आले आहे.

Leopard News
Latur crime: शिवणखेड येथे नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले
अकोलादेव येथील वाघ दिसल्याचे वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या आहे. हा प्राणी वाघ नसून हा बिबट्याच असू शकतो. आपल्याकडे सरासरी वाघ दिसत नाही.
संभाजी हटकर, वनरक्षक
टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी जागरूक राहावे. शिवारात वाघ, बिबट्या, कोल्हे, हायवेवर रोड रस्ता ओलांडून जात आहे. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.
पवन झोरे, जाफराबाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news