Simhastha Kumbh Mela 2026 |भूसंपादनाअभावी साडेबारा हजार कोटींची कामे रखडली

Simhastha Kumbh Mela 2026 | कुंभातील पायाभूत प्रकल्पांना फटका; प्रत्यक्षात केवळ साडेदहा हजार कोटींचीच कामे सुरू
Simhastha Kumbh Mela Nashik
Janori Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने आतापर्यंत २३ हजार १२९ कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मात्र, त्यापैकी प्रत्यक्षात केवळ साडेदहा हजार कोटी रुपयांचीच कामे सुरू आहेत. उर्वरित प्रकल्प निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी व विशेषतः भूसंपादनाच्या अडचणींमुळे रखडलेले असून सुमारे १२ ते साडेबारा हजार कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष सुरूच होऊ शकलेली नाहीत.

Simhastha Kumbh Mela Nashik
Lasalgaon Onion News: कांदा उत्पादकांना केंद्राचा धक्का! निर्यात प्रोत्साहनात मोठी कपात; बाजारभाव घसरणार?

दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून हजारो साधू-संत, तसेच १३ आखाड्यांचे साधू नाशिक–त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. त्यांच्या निवासासाठी साधुग्राम, तर पर्वणी काळात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी वाहनतळ, बाह्य वळण रस्ते, घाट बांधणी, गोदावरी स्वच्छता, स्नानघाट, दर्शनमार्ग, रस्ते, पूल, वीज, पाणी, मलनिःसारण, रेल्वे व गर्दी व्यवस्थापन व्यवस्था उभारणे आवश्यक असते.

यंदाच्या प्रयागराज कुंभमेळ्यात अभूतपूर्व गर्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक कुंभासाठी भाविकसंख्या पाचपटीने वाढण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने भव्य पायाभूत आराखडा तयार केला आहे. त्यासाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून, पुढील टप्प्यात निधीत वाढ होण्याचीही शक्यता आहे.

निधी वितरणाचा तपशील

राज्य शासनाने सिंहस्थासाठी १३ हजार ११४ कोटी रुपये, तर इतर प्रकल्पांसाठी १ हजार २५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
केंद्र सरकारकडून ८ हजार ७६१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून नाशिक–त्र्यंबकेश्वर परिसरात

  • रस्ते व पूल

  • रिंगरोड

  • घाट विकास

  • साधुग्राम

  • रेल्वे प्रकल्प

  • विमानतळ

  • रेल्वेस्थानक आधुनिकीकरण

  • पाणी, वीज व मलनिःसारण व्यवस्था

  • गर्दी व्यवस्थापन प्रकल्प

अशा विविध पायाभूत सुविधा हाती घेण्यात आल्या आहेत.

मात्र, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील रिंगरोड, त्र्यंबकेश्वर दर्शनपथ, त्र्यंबकेश्वर गोदावरी घाट, नाशिक साधुग्राम, द्वारका चौक ते नाशिकरोड रस्ता रुंदीकरण, त्र्यंबकेश्वर साधुग्राम आदी जवळपास १२ हजार कोटी रुपयांची कामे भूसंपादनाअभावी रखडलेली आहेत. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या प्रकल्पांना गती मिळणार असून, सिंहस्थपूर्व सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

केंद्राच्या निधीतील प्रमुख कामे

  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत घोटी–त्र्यंबकेश्वर महामार्गासह
    २ हजार ७६३.२४ कोटींची ९ रस्ते कामे

  • सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग विभाग)
    ४ हजार ३५५.९२ कोटींची कामे

  • रेल्वेस्थानक विकास १ हजार ३२९.२४ कोटी

  • द्वारका सर्कल व रामकुंड परिसर सुधारणा सुमारे ३०० कोटी रुपये

राज्य शासनाच्या निधीतील कामे

  • बाह्य परिक्रमा मार्ग

  • ओझर विमानतळ विस्तारीकरण

  • घाट विकास

  • त्र्यंबकेश्वर दर्शनपथ

  • वाहनतळ व होल्डिंग एरिया

  • मलनिःसारण प्रकल्प

  • बस टर्मिनस

  • रेल्वेस्थानक आधुनिकीकरण

  • वीज, पाणी व मलनिस्सारण व्यवस्था

निधी वाटप :

  • सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) – २,२७०.६१ कोटी

  • कुंभमेळा प्राधिकरण – ९,३६०.७५ कोटी

  • मलनिःसारण प्रकल्प – १,४८२.९५ कोटी

  • एकूण : १३,११४.३१ कोटी रुपये

Simhastha Kumbh Mela Nashik
IIT Goa Campus News | आयआयटी गोवाच्या कायमस्वरूपी कॅम्पससाठी हालचालींना वेग! सरकारने 'या' 3 जागा केल्या निश्चित

अतिरिक्त निधी

  • त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास – २७५ कोटी

  • वीज प्रकल्प – ९४३.३६ कोटी

  • कावनई, सर्वतीर्थ टाकेद व बेझे येथील विकासकामे – ३५.०८ कोटी

एकूण अतिरिक्त मंजुरी : १,२५३.४४ कोटी रुपये

एकूण निधी

राज्य + केंद्र निधी : १४ हजार ३६७ कोटी रुपये

भूसंपादनाचा अडसर असलेली प्रमुख कामे

  • घोटी–त्र्यंबकेश्वर महामार्ग

  • सिंहस्थ परिक्रमा मार्ग

  • द्वारका चौक ते नाशिकरोड रस्ता रुंदीकरण

  • तपोवन साधुग्राम

  • त्र्यंबकेश्वर दर्शनपथ

  • त्र्यंबकेश्वर साधुग्राम

  • त्र्यंबकेश्वर गोदावरी घाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news