IIT Goa Campus News | आयआयटी गोवाच्या कायमस्वरूपी कॅम्पससाठी हालचालींना वेग! सरकारने 'या' 3 जागा केल्या निश्चित

IIT Goa Campus News | कॅम्पससाठी जमीन अंतिम करण्याचा सरकारचा नवा प्रयत्न
Pune News
Pune Government LandPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (आयआयटी गोवा) कायमस्वरूपी कॅम्पससाठी जमीन निश्चित करण्याचा आणखी एक प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकांना साधारण एक वर्ष शिल्लक असताना, सरकारने दोन नवीन ठिकाणे आणि यापूर्वी निवडलेल्या (शॉर्टलिस्ट) एका जुन्या ठिकाणाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune News
Bombay High Court | बांधकाम परवानग्यांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय! सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करा

शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या तीन ठिकाणांमध्ये फोंडा तालुक्यातील उसगाव येथील कोमुनिदाद जमीन, केरी (फोंडा) येथील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आणि धारबांदोडा येथील साखर कारखान्यांचा परिसर यांचा समावेश आहे. याआधी फोंडा तालुक्यातील कोडार येथे १४ लाख चौरस मीटर कोमुनिदाद जमिनीवर कॅम्पस उभारण्याचा प्रस्ताव स्थानिक विरोधामुळे मागे घेण्यात आला होता.

यापूर्वीच सरकारने -आयआयटीसाठी योग्य जागा लवकरच अंतिम केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. आयआयटी गोवा २०१६ पासून कार्यरत असून सध्या गोवा इंजिनिअरिंग कॉलेज, फर्मागुढी येथील तात्पुरत्या कॅम्पसमधून शिक्षण देत आहे.

Pune News
Sanvordem Panchayat Protest | मिराबाग बंधाऱ्याविरोधात सावर्डेवासीय आक्रमक

दरम्यान, गेल्या काही वर्षांत आयआयटीसाठी निवडलेली अनेक ठिकाणे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या साइट सिलेक्शन समितीने नाकारली किंवा स्थानिक नागरिकांच्या तीव्र आंदोलनांमुळे रद्द झाली. यामध्ये सांगे येथील रिपण परिसरातील सुमारे १०.५ लाख चौरस मीटर जमिनीचा प्रस्तावही समाविष्ट होता, जो जमिनीच्या मालकीविषयक अडचणींमुळे अखेरीस रद्द करण्यात आला.

सरकारने यापूर्वी धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या जागेवर कॅम्पस उभारण्याची प्रक्रिया सुरू केली होती; मात्र नंतर लक्ष कोडारकडे वळवण्यात आले. साखर कारखान्याची जागा अद्याप विचाराधीन असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news