Nashik Kumbh Mela 2027 | पावसाळ्यातही कुंभमेळ्याचा उत्साह टिकणार! टेंट सिटी आणि साधुग्रामसाठी विशेष 'वॉटरप्रूफ' नियोजन

Nashik Kumbh Mela 2027 | कुंभमेळा प्राधिकरणाची तांत्रिक भागीदारांसमवेत बैठक
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या सुविधा पार्श्वभूमीवर टेंट सिटी व साधुग्राम परिसरातील तात्पुरत्या पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने तंबू उभारणी व पायाभूत सुविधा क्षेत्रातील तांत्रिक भागीदारांसोबत पाठपुरावा बैठक घेतली.

Nashik Kumbh Mela 2027
Janori Kumbh Mela 2026 | जानोरीत कुंभपर्वणीची जोरदार तयारी

जानेवारीत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर झालेल्या या बैठकीत विविध तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाली. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरीश सहाय, नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, मुख्याधिकारी अमोल चौधरी, प्राधिकरणाचे तहसीलदार योगेश चंद्रे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व इतर अधिकारी आणि संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत गत कुंभमेळ्यातील अनुभवांचा आढावा घेऊन पावसाळ्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक सक्षम तांत्रिक मानके निश्चित करण्यावर भर देण्याबाबत चर्चा झाली. बैठकीत मान्सून काळात प्रभावी ठरलेल्या उपायांची चर्चा झाली. पूर्ण जल व अग्निरोधक तंबू साहित्य, जोरदार वाऱ्यांना तोंड देणारी अँकरिंग व्यवस्था, उंचावलेली फ्लोअरिंग, दुहेरी छप्पर, 'स्टॉर्म फ्लॅप्स' अशा उपाययोजनांचा विचार करण्यात आला.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Ring Road | रिंग रोड भूसंपादनावर नागरिकांचा रोष कायम

सततच्या पावसात झिरपणे व गळती टाळण्यासाठी तंबूंच्या उपाययोजना, जमिनीच्या पातळीवरील संपर्कभाग सुरक्षित करणे, तंबू समूहाभोवती योग्य पाणी निचऱ्याची रचना यावरही चर्चा झाली.

विद्युत सुरक्षेबाबत प्रत्येक तंबू समूहासाठी सक्षम विद्युत व्यवस्था, पावसापासून विद्युत पॅनलचे संरक्षण, बाह्य वापरासाठी योग्य दर्जाची अग्निप्रतिरोधक केबल तसेच विद्युत बिघाडांसाठी आपत्कालीन प्रतिसाद आराखडा तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

पाणीपुरवठ्यासंदर्भात सततच्या पावसात पाइप गळती रोखणे, पाणी साचू नये यासाठी निचऱ्याची व्यवस्था, पाइप फुटीप्रसंगी तातडीच्या कृती आराखड्याबाबतही विचारमंथन झाले. टेंट सिटीतील काही भागात बांबूआधारित संरचना उभारणार असल्यामुळे त्यासाठी स्थैर्यपूर्ण आणि हवामान प्रतिरोधक डिझाइन अवलंबिण्याच्या सूचना देण्यात आल्या

सिंहस्थकाळात मान्सून ही मोठी परीक्षा असते. कोणतीही सेवा खंडित होऊ नये आणि भाविकांच्या सुरक्षिततेत तडजोड होऊ नये, यासाठी नियोजन अधिक काटेकोर केले जात आहे.

शेखर सिंह, आयुक्त, कुंभ प्राधिकरण, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news