

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क | नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गासंदर्भात आज वक्फ बोर्डात सुनावणी होणार आहे.
नाशिकच्या भाभानगर दर्ग्यासंदर्भात आज वक्फ बोर्डात सुनावणी
सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगरपालिका यांच्यात सुनावणी
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुनावणी
सकल हिंदू समाज हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची शक्यता
जिल्हा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना वक्फ बोर्डात आज सुनावणी
वक्फ बोर्डात आज काय घडतं? याकडे लक्ष
सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगर पालिका यांच्यात सुनावणी होत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार (दि.3) रोजी होणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनेही हस्तक्षेप याचिका दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतांना वक्फ बोर्डात सुनावणी होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात नाशिक महानगरपालिकेने दर्गा परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते.