नाशिक : कादवाचा गळीत हंगाम, डिस्टिलरी सुरळीत

नाशिक : कादवाचा गळीत हंगाम, डिस्टिलरी सुरळीत

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम व डिस्टिलरी प्रकल्प सुरळीत सुरू झाले असून, साखर व स्पिरिटचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाले आहे. कादवा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उसाला जिल्ह्यात सर्वाधिक भाव देत असून, सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखणार असून, शेतकऱ्यांनी कादवाला ऊसपुरवठा करावा, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे.

कादवाची गाळप क्षमता 2500 मे. टन प्रतिदिन असून, कादवाने पुरेशा प्रमाणात ऊसतोड कामगारांची भरती केली आहे. ऊसतोडणीचा कार्यक्रम आखला असून, त्यानुसार ऊसतोडणी सुरू आहे. रविवारी (दि.19) २५७२.२४० मे. टन गाळप होत १०.०५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर या हंगामात आतापर्यंत ३३०४०.६८७ मे. टन गाळप होत २९४५० क्विंटल साखरनिर्मिती होत सरासरी साखर उतारा ९.११ % मिळाला आहे. डिस्टिलरी प्रकल्प प्रारंभ नुकताच झाला. यावेळी चेअरमन श्रीराम शेटे, व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, अधिकारी-कामगार उपस्थित होते. प्रकल्पात पूर्ण क्षमतेने स्पिरिट निर्मिती सुरू झाली असून, लवकरच इथेनॉल निर्मिती होणार आहे.

कादवाचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू असून, कादवा उसाला सर्वाधिक ऊसदर सातत्याने देत आला आहे. यंदा पहिला हप्ता रु. 2500 दिला जाणार असून, हंगाम संपताच शासन नियमानुसार अंतिम एफआरपी दर ठरणार आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता कार्यक्रमानुसार ऊसतोड करत उज्ज्वल भवितव्यासाठी कादवालाच ऊसपुरवठा करावा.

– श्रीराम शेटे, चेअरमन कादवा सहकारी साखर कारखाना

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news