मोबाईल फोनचा दरमहा 5 हजार खर्च वाचविला : पंतप्रधान मोदी | पुढारी

मोबाईल फोनचा दरमहा 5 हजार खर्च वाचविला : पंतप्रधान मोदी

पाली (राजस्थान); वृत्तसंस्था : डेटाचे दर जर आजही 2014 पूर्वीचेच राहिले असते… आणि तुमच्या कुटुंबात किमान 4 मोबाईल फोन असतील, त्यावर आज तुम्ही जितका डेटा खर्च करत आहात, त्याचा हिशेब लावला तर तुम्हाला दरमहा किमान 5 हजार रुपये जास्तीचे खर्च करावे लागले असते. केंद्रातील भाजप सरकारने तुमच्या मोबाईल फोनचे बिलही कमी केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जनतेला अशा बर्‍याच गोष्टी माहिती नसतील, ज्या जनतेसाठी आम्ही केलेल्या आहेत. काय केले, काय केले, अशी सारखी विचारणा जनतेसाठी काहीही न करणार्‍या आणि स्वत:चे खिसे भरणार्‍या विरोधी पक्षांकडून होते, म्हणून मी हे उदाहरण दिले, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. देशातील बहुसंख्य लोक अद्ययावत व्हावेत म्हणून डेटाचे दर कमीत कमी कसे केले जातील, त्यावर आम्ही भर दिला, असे पंतप्रधानांनी सांगितले. पाली जिल्ह्यातील जाडन येथे झालेल्या सभेत पंतप्रधान बोलत होते. हनुमानमड जिल्ह्यातील पिलीबंगा येथे सभा, बिकानेरमध्ये रोड शो असे पंतप्रधानांच्या सोमवारच्या कार्यक्रमांचे नियोजन होते.

मोदींचे प्रमुख तीन मुद्दे

1) कुटुंबाची सोय हे काँग्रेसचे ध्येय राजस्थानमध्ये काँग्रेसने भ्रष्टाचाराशिवाय काहीही केलेले नाही. कुटुंबाची सोय करून ठेवणे, हेच विरोधी पक्षांतील नेत्यांच्या राजकारणातील रसाचे रहस्य आहे.
2) विशिष्ट गटांचे तुष्टीकरण
हा निवडणूक जिंकण्याचा सोपा विनाकष्टाचा मार्ग अशा प्रकारातील नेत्यांना वाटतो आणि ते हेच करतात. कारण तुष्टीकरणासाठी खर्च करावा लागत नाही. राज्य त्यामुळे संकटात सापडतेच; पण दंगलखोर आणि दहशतवाद्यांचे मनोबलही उंचावते.
3) पेट्रोल अधिक दराने विकले
राज्यात पेट्रोल-डिझेल काँग्रेसने वाढीव दराने विकून पैसा लाटलाच; पण राजस्थानातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठ्याची योजनाही काँग्रेसने लुटली. निम्म्या लोकसंख्येपर्यंत पाणी पोहोचले नाही.

Back to top button