Money Lending Case | 20 लाखांच्या कर्जावर 48 लाखांची वसुली; व्यावसायिकाचे अपहरण

Money Lending Case | सद्दाम शेख व आईविरोधात पंचवटी पोलिसांत गुन्हा
Fund
MoneyPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
२० लाख रुपयांच्या कर्जापोटी ४८ लाख रुपये व्याज वसूल करूनही ५० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप असलेल्या सद्दाम बाबू शेख व त्याची आई लता बर्डे यांच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमृतधाम येथील व्यावसायिक विजय पुंडलिक शिरोडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Fund
Nashik Bazar Samiti | नाशिक बाजार समितीला न्यायालयाचा मोठा दणका; 14 बँक खाती गोठवण्याचे आदेश!

फिर्यादीनुसार, २०२१ पासून शेख व बर्डे यांनी बेकायदेशीर सावकारी केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी शिरोडे यांना भगवती हॉटेल परिसरात बोलावून मारहाण करत कारमधून अमृतधाम येथील गोल्डस्टार कन्स्ट्रक्शन कार्यालयात नेले. तेथे चार तास डांबून ठेवत ५० लाखांची मागणी केली.

पैसे न दिल्यास शिरोडे व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.दरम्यान, संशयितांनी शिरोडे यांच्या सर्व्हे क्रमांक २६१/२ मधील प्लॉटवरही ताबा मिळवल्याचा आरोप आहे.

Fund
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वेसाठी आता निर्णायक पाठपुराव्याची गरज

डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंटवर दबाव टाकून सह्या करून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. प्लॉटचा ताबा न दिल्यास खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सद्दाम शेखविरोधात यापूर्वीही जमिनीवर ताबा मिळवून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सावकारी, अपहरण व खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. उपनिरीक्षक कैलास जाधव पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news