

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बर्च नाईटक्लब आगीत मृत्युमुखी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना गोवा सरकारकडून भरपाई देण्याच्या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मान्यता दिली आहे, तसेच ही भरपाईची रक्कम संबंधित जबाबदार संशयितांकडून वसूल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले पत्त्यावर नोटिसा बजावणार मागील सुनावणीवेळी खंडपीठाने या अग्निकांड प्रकरणाशी संबंधित असलेल्या विविध खात्यांना तसेच संशयितांना नोटीस बजावली होती.
यातील काही संशयित अजून कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना या नोटिसा पोहोचल्या नाहीत. यावेळी सरकारी वकिलांनी या संशयितांपर्यंत पोलिसांमार्फत त्यांच्या पत्त्यावर नोटिसा बजावण्यात येतील, अशी माहिती दिली. कोट्यवधी निधीचा जीसीएमध्ये गैरव्यवहार सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करा; खंडपीठाचे निर्देश आहेत.
या प्रकरणात उच्च न्यायालयाने गोवा सरकारला संशयितांच्या मालमत्तेचा सविस्तर तपशील संकलित करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात लुथरा बंधू तसेचसरपंच रोशन रेडकर यांचा समावेश आहे.
खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतलेल्या याचिकेवरील सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. पत्त्यावर नोटिसा बजावणार मागील सुनावणीवेळी खंडपीठाने या अग्निकांड प्रकरणाशी संबंधित असलेल्या विविध खात्यांना तसेच संशयितांना नोटीस बजावली होती.
यातील काही संशयित अजून कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना या नोटिसा पोहोचल्या नाहीत. यावेळी सरकारी वकिलांनी या संशयितांपर्यंत पोलिसांमार्फत त्यांच्या पत्त्यावर नोटिसा बजावण्यात येतील, अशी माहिती दिली.