

आपच्या १० लाखांच्या आरोग्य विमा घोषणांवर विश्वजित राणेंचा पलटवार
दिल्लीचे आरोग्य मॉडेल यशस्वी असते तर आपला पराभव झाला नसता – राणे
गोवा आरोग्य मॉडेल देशातील सर्वोत्तम असल्याचा दावा
बाहेरून येऊन खोटी आश्वासने देऊ नयेत – आरोग्यमंत्री
गोवेकर अशक्य घोषणांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास
पणजी : पुढारी वृत्तसेवा
आपचे नेते गोव्यात येऊन आप सत्तेवर आल्यास गोवेकरांना १० लाखांचे आरोग्य विमा कवच देण्याची घोषणा करत आहेत. दिल्लीचे व पंजाबचे आरोग्य मॉडल चांगले असल्याचे सांगत आहेत; पण दिल्लीचे आरोग्य मॉडल चांगले होते तर आप दिल्लीत पराभूत झाला नसता, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.
विश्वजित राणे विमा मंगळवारी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी राणे यांना केजरीवाल व भगवंत मान यांनी केलेल्या १० लाखांच्या आरोग्य विमाबद्दल विचारले असता राणे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. गोवा आरोग्य मॉडेल हेच देशामध्ये सर्वात प्रिय मॉडेल आहे. लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी गोवा सरकार व आपण समर्थ आहोत.
बाहेरून येऊन गोवेकरांना कितीही खोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न कुणी केला तरीही गोवेकर भुलणार नाहीत. बाहेरच्या नेत्यांनी गोव्यात येऊन अशक्य होणाऱ्या घोषणा करू नयेत. दिल्लीत घोषणांचा परिणाम काय झाला हे सगळ्यांना माहीत आहे, असे राणे म्हणाले.