Nashik Ganeshotsav : गणपती मिरवणुकीच्या नियोजनाची आज बैठक

Nashik Ganeshotsav : गणपती मिरवणुकीच्या नियोजनाची आज बैठक
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. २५) होणारी बैठक मंगळवारी (दि. २६) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सार्वजनिक मंडळांच्या सहभाग क्रमांक निश्चित होणार आहे. तसेच बैठकीनंतर सर्व विभागांचे अधिकारी मिरवणूक मार्गाची अंतिम पाहणी करणार आहेत.

संबधित बातम्या :

नाशिक शहर पोलिस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग क्रमांक निश्चितीसह इतर नियमावली ठरविण्यासाठी बैठक होणार होती. काही तांत्रिक कारणामुळे ही बैठक स्थगित करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही बैठक मंगळवारी (दि. २६) दुपारी भद्रकाली पोलिस ठाण्यात होणार आहे. नियोजनानंतर विसर्जन मिरवुणकीचा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. भद्रकाली हद्दीतील वाकडी बारव, धुमाळ पॉइंट व मेहेर सिग्नलजवळ पोलिसांचा निरीक्षण कक्ष राहणार आहे.

बारा कॅमेऱ्यांतून नियंत्रण

स्मार्ट सिटीतर्फे मिरवणूक मार्गावर आठ ठिकाणी बारा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण पोलिस आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षात देण्यात आले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातून मिरवणुकीतल्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर असणार आहे. मिरवणुकीत रेंगाळलेल्या मंडळांना सूचना करणे, टवाळखोरांवर कारवाई करणे, गुन्हेगारांचा शोध घेणे या बाबी या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना शक्य होणार आहे.

मिरवणूक मार्गावर बॅरिकेडिंग

भद्रकालीतील चौक मंडईजवळील वाकडी बारव येथून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होणार असून फुले मंडई, अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरवरून गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून गोदाकाठावरील म्हसोबा महाराज पटांगणाकडे मिरवणूक मार्गस्थ होईल. या संपूर्ण मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडिंग करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news